शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बालरूग्णाच्या रक्त तपासणीत विलंब

By admin | Updated: February 4, 2017 02:16 IST

माझ्या मुलीची प्रकृती ठिक नसल्याने तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बालरूग्ण विभागात १९ जानेवारीला दाखल करण्यात आले.

जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रकार : अनेक कर्मचाऱ्यांकडून वेळकाढूपणाचे धोरण गडचिरोली : माझ्या मुलीची प्रकृती ठिक नसल्याने तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बालरूग्ण विभागात १९ जानेवारीला दाखल करण्यात आले. औषधोपचार सुरू असतानाही पूर्वीच्या तुलनेत माझ्या मुलीची प्रकृती अधिक ढासळली. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या सांगण्यानुसार रक्त तपासणीकरिता नमुने घेण्यात आले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून येथील प्रयोगशाळेत रक्ताची तपासणी करण्यात आली नाही. रक्त तपासणीत प्रचंड विलंब होत आहे, असा आरोप चामोर्शी तालुक्याच्या तळोधी मो. येथील रूग्णाचे वडिल मिलिंद मेडपीलवार यांनी लोकमतशी बोलताना केला आहे. माझ्या मुलीला निमोनिया कपचा त्रास असल्याने आपण १९ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. बालरोगतज्ज्ञ डॉ. ठवरे यांच्याकडून नियमित तपासणी व परिचारिकांकडून औषधोपचार सुरू झाले. रूग्णास दररोज इंजेक्शन लावले जात आहे. मात्र प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडतच चालली आहे. तीन दिवसापूर्वी माझ्या मुलीच्या नाकातून रक्त येऊ लागले होते. तसेच शौचातूनही रक्त जात होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीकरिता रक्तनमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मात्र दुसऱ्याही दिवशी रिपोर्ट प्राप्त न झाल्याची माहिती आपणास मिळाली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगशाळेत जाऊन विचारणा केली असता, रिपोर्ट घ्यायला कोणीच आले नाही, असे सांगण्यात आले. ३ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास बालरूग्ण कक्ष नऊ मधील उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी सदर रिपोर्ट निरंक असल्याने क्रॉस करून पाठविल्याचे आपणास सांगितले, असे मेडपीलवार यांनी म्हटले आहे. शंका बळावल्याने आपण पुन्हा प्रयोगशाळेत जाऊन रिपोर्टबाबत विचारणा केली असता, तेथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मैदमवार यांनी चौकशी केली. यावेळी रक्त नमुन्याची तपासणी झाली नाही, असे दिसून आले. वेळकाढूपणाच्या धोरणामुळे येथील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास होत आहे, असे मेडपीलवार यांनी म्हटले. रूग्णालय प्रमुखांनी प्रयोगशाळा व इतर सर्व विभागाकडे बारकाईने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) मिलिंद मेडपीलवार यांच्या १० महिन्याच्या मुलीला १८ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बालरूग्ण विभागात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी सदर बालिकेचे रक्त नमुने तपासणी करण्यात आली. याशिवाय एक्सराही काढण्यात आला. सर्व रिपोर्ट निगेटीव्ह होते. मात्र पुन्हा ताप आल्याने रक्त तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. सदर बालिकेवर योग्यरित्या औषधोपचार सुरू आहे. वय कमी असल्याने सदर रूग्ण औषधोपचाराला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही. सदर बालिकेच्या औषधोपचाराकडे परिपूर्ण लक्ष पुरविले जाईल. - डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रूग्णालय गडचिरोली