गतवर्षीच्या हंगामात : धानोरा, आरमोरी, कुरखेडा, कोरची तालुक्यातील ११ केंद्रावर अवाजवी घटगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत धानोरा, आरमोरी, कुरखेडा, कोरची या उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १५ धान खरेदी केंद्रावरून संस्थांनी गतवर्षी २०१४-१५ च्या आधारभूत खरेदी हंगामात एकूण १ लाख २० हजार ६६०.१४ क्विंटल धानाची खरेदी केली. मात्र योग्य साठवणूक न झाल्याने ११ केंद्रांवर धान खरेदी केल्यापासून तर धानाची उचल होईपर्यंत यामध्ये एकूण ९५९.५९ क्विंटल धानाची अवाजवी घट महामंडळाला दिसून आली. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सुरसुंडी येथील धान खरेदी केंद्रावर गतवर्षीच्या हंगामात एकूण ४३१९.४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी १२१.७४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून त्याची किमत २ लाख ९४ हजार रूपये आहे. चातगाव केंद्रावर एकूण १२५२.२२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी ११.९८ क्विंटल धानाची घट दिसून आली. याची किमत २८ हजार ९३२ रूपये आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत दवंडी केंद्रावर एकूण १०६९६.०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यामध्ये १०३.२८ क्विंटल धानाची घट आली असून याची किमत २ लाख ४९ हजार ४२१ रूपये आहे. अंगारा केंद्रावर ८२५४.७१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यामध्ये ३४.५४ धानाची घट दिसून आली. मौशिखांब केंद्रावर ८१६७.०८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यामध्ये ५०.१३ क्विंटल धानाची घट दिसून आली. घट आलेल्या धानाची किमत १ लाख २१ हजार ६४ रूपये आहे. कुरखेडा केंद्रावर ८७.२९ क्विंटल, नान्ही केंद्रावर ८.६० क्विंटल, आंधळी केंद्रावर १८८.७९ क्विंटल धानाची घट दिसून आली. कोरची तालुक्यातील कुलकुली केंद्रावर १४७.३७, मालेवाडा केंद्रावर ११५.०१० व येंगलखेडा केंद्रावर ९१.३० क्विंटल धानाची घट दिसून आली. (स्थानिक प्रतिनिधी)२३ लाख १७ हजार रूपये होणार वसूलआदिवासी विकास महामंडळाच्या धानोरा, आरमोरी, कुरखेडा, कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी गतवर्षी २०१४-१५ च्या हंगामात ११ केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानामध्ये ९५९.५९ क्विंटल धानाची घट आली. या घटीच्या धानाची रक्कम एकूण २३ लाख १७ हजार ४३५ रूपये आहे. सदर रक्कम महामंडळाच्या वतीने संस्थांच्या कमिशनमधून कपात करण्यात येणार आहे. अवाजवी घट आलेल्या धानाची रक्कम वसूल करू नये, अशी मागणी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
संस्थांनी खरेदी केलेल्या धानात ९५९ क्विंटलची घट
By admin | Updated: November 23, 2015 01:17 IST