शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

औद्योगिकीकरण व शहरीकरणात ऱ्हास वाढला

By admin | Updated: June 5, 2016 01:10 IST

वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

जागतिक पर्यावरण दिन : भविष्यातील धोके टाळण्यासाठी पर्यावरण रक्षणाची गरजगडचिरोली : वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पर्यायी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचे संंरक्षण केवळ सरकारची जबाबदारी नसून भविष्यातील धोके टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे. दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे व पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवाचे जीवन सुखी झाले. अनेक यंत्र मानवाच्या सुखासाठी सज्ज झाले. मात्र दुसऱ्या बाजूला या औद्योगिक क्रांतीची विषारी फळेही मानवाला पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे चाखायला मिळू लागली. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही अत्यंत महत्त्वाची बाब निर्माण झाली आहे. जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. राज्य शासनाने पर्यावरणाचे महत्त्व ओळखून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही हा विषय आवश्यक केला आहे. जंगलतोड थांबविण्यासाठी गॅस वाटपवडसा वन विभाग एकूण १ लाख ५१ हजार ३०५ हेक्टरवर पसरले आहे. वन व्यवस्थापन समित्यांचे सदस्य व नागरिकांना जंगलाचे महत्त्व पटवून देण्यात आले. जंगलाची तोड होऊ नये म्हणून गॅसचे वितरणही करण्यात आले आहे. वन विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत असल्याने जंगलतोडीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. तर दुसरीकडे जंगलात वन्य जीवांची संख्या वाढत चालली आहे. वन्य जीवांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. जिल्हा पर्यावरण संवर्धनाचा मार्गदर्शकगडचिरोली जिल्ह्यात एकूण भूभागाच्या ७८ टक्के जमीन जंगलाने व्यापली आहे. येथील जनता मागील अनेक वर्षांपासून या जंगलाचे पोटच्या पोराप्रमाणे संरक्षण करीत आहे. गडचिरोलीत उद्योगांची संख्या नगण्य असल्याने पर्यावरण प्रदूषणाचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. गडचिरोली जिल्हा पर्यावरण संवर्धनाबाबत इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. वन विभागाच्या प्रकल्पातून रोजगाराच्या संधी उपलब्ध जंगलाच्या संरक्षणाचे लाभ जिल्ह्यातील नागरिकांना चाखायला मिळत आहेत. हजारो नागरिकांना वन पट्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना हक्काची जमीन उपलब्ध झाली आहे. वनोपज गोळा करण्याचे हक्क बहाल झाल्याने रोजगाराची समस्या सुटली आहे. वन विभागाने अगरबत्ती प्रकल्प, जैवविविधता प्रकल्प सुरू केल्याने रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कॉर्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण वाढलेवाढत्या जंगलाच्या ऱ्हासामुळे वातावरणातील कॉर्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण वाढले आहे. याचे गंभीर परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीला भोगावे लागत आहेत. कॉर्बनडॉय आॅक्साईडचे प्रमाण कमी करून आॅक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी झाडांची संख्या वाढविणे हा एकमेव उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने दरवर्षी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलावी.प्लास्टिक वापर टाळण्यासाठी जनजागृतीची गरजशहरी कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिक कचऱ्याचे राहते. तयार झालेले प्लास्टिक पूर्णपणे कुजण्यास ५०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. शहरामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळावा, यासाठी नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.