शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:41 IST

आरमोरी : या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अल्प असून बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणीची कामे खोळंबली आहेत. आरमोरी तालुक्यातील शेतकरी ...

आरमोरी : या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अल्प असून बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणीची कामे खोळंबली आहेत. आरमोरी तालुक्यातील शेतकरी हा अस्मानी-सुलतानी संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आरमोरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना व युवासेना शाखा आरमोरीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली आहे.

या वर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या. परंतु सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्याने तलाव, बोड्या रिकाम्या आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या धान रोवणीची कामे खोळंबली असून हलक्या धानाचे पऱ्हे हे निसवण्याच्या मार्गावर आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तलाव, बोळ्यांमध्ये थोडेफार पाणी साचलेले होते त्या पाण्याने कशीबशी धानाची रोवणी केली परंतु गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रोवणी झालेले धानपीक करपण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यातील शेतजमिनींचे पंचनामे करून लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आरमोरी तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आली.

तहसीलदारांना निवेदन देताना युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, भूषण सातव, लहानू पिलारे, रामदास डोंगरवार, पुंजीराम मेश्राम, माजी जि. प. सदस्य वेणू ढवगाये, नगरसेवक माणिक भोयर, कवळू सहारे, मेघा मने, शैलेश ढोरे, विजय मुरवतकार, शैलेश चिटमटलवार, अनिल पारधी, उल्हास बनपूरकर, वसंत गेडाम, ज्ञानेश्वर ढवगाये, राजू ढोरे, किशोर मेश्राम, सतीश गुरनुले, टिकाराम खेवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

270821\img-20210827-wa0039.jpg

आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करताना सेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते