मुख्यमंत्र्यांना निवेदन : भारिप-बहुजन महासंघातर्फे आंदोलनगडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी सरासरी ५० टक्क्याहून कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे. हजारो हेक्टर जमीन रोवणीअभावी पडून आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, यासाह इतर मागण्यांसाठी भारिप-बहुजन महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नाही, ती त्वरित वाटप करावी, चालू शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती द्यावी, ओबीसीचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, दलित आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारास पायबंद घालण्यासाठी अडक उपाययोजना कराव्या, सूरजागड येथील खनिजावर आधारित उद्योग गडचिरोली जिल्ह्यातच सुरू करावा, इतर जिल्ह्यात लोहखनिज नेण्यास परवानगी देऊ नये, वनजमिनीचे पट्टे मंजूर करावे, आष्टी एमआयडीसीमधील शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, प्रत्येक शेतकरी कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, कुलपती मेश्राम, नसीर जुम्मन शेख, पुणेश्वर दुधे, जगन जांभुळकर, वनमाला भजगवळी, भीमराव ढवळे, पत्रू टेंभुर्णे, सी. जे. मेश्राम, डॉ. हरिदास नंदेश्वर, जितेंद्र गलबले, जगन बन्सोड, गोवर्धन काळे, किलाबाई वनकर, कांता ढवळे, शंकर मारशेट्टीवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा
By admin | Updated: September 12, 2015 01:22 IST