शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दंड रद्द करण्याचा ठराव धुडकावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:05 IST

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गटार सफाई, घंटागाडी, गांढूळ खत निर्मिती करिता करारनाम्याप्रमाणे कंत्राटदारांनी लावायचे ठराविक मजूर कमी असल्यास करारनाम्याप्रमाणे आकारण्यात येणारी दंडाची रक्कम रद्द करण्याबाबतचा ठराव नगर परिषदेच्या ४ जूनच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता.

ठळक मुद्देगडचिरोली न.प.च्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा : करारनाम्यानुसार मजूर ठेवावेच लागतील

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गटार सफाई, घंटागाडी, गांढूळ खत निर्मिती करिता करारनाम्याप्रमाणे कंत्राटदारांनी लावायचे ठराविक मजूर कमी असल्यास करारनाम्याप्रमाणे आकारण्यात येणारी दंडाची रक्कम रद्द करण्याबाबतचा ठराव नगर परिषदेच्या ४ जूनच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. मात्र अपवाद वगळता सर्व नगरसेवकांनी याला तीव्र विरोध दर्शवित सदर ठराव धुडकावून लावला. करारनाम्याप्रमाणे कंत्राटदाराला तेवढे मजूर ठेवावेच लागतील, अशी ताठर भूमिका नगरसेवकांनी घेतली.गटार सफाई, घंटागाडी, गांढूळ खत निर्मितीसाठी कामगार पुरविण्याचे कंत्राट तीन कंत्राटदारांना देण्यात आले आहे. नगर परिषद प्रत्येक मजुराची मजुरी म्हणून कंत्राटदाराला जवळपास ४०० रूपये देते. ठराविक मजुरांपेक्षा कमी मजूर असल्यास प्रती मजूर ५०० रूपये कपात करण्यात येईल, असे करारनाम्यातच लिहिण्यात आले होते. कंत्राटदारांनी कंत्राट घेतला. त्यावेळी करारनामा वाचला नाही काय, असा प्रश्न बहुतांश नगरसेवकांनी उपस्थित केला. केवळ कंत्राटदारांची मर्जी राखण्यासाठी सदर ठराव मांडण्यात आला आहे. अशी टिका करीत बहुतांश नगरसेवकांनी या ठरावाला विरोध करीत सदर ठराव धुडकावून लावला.सोम ईलेक्ट्रीकल नागपूरच्या वतीने गडचिरोली शहरात एक्सप्रेस फिडर बसविण्यात आले आहे. कंत्राटदाराची सुरक्षा रक्कम देण्यासंदर्भातचा ठराव होता. मात्र एक्सप्रेस फिडर सद्य:स्थितीत सुरू आहे किंवा नाही, याची चौकशी केल्याशिवाय सुरक्षा रक्कम देऊ नये, असा ठराव घेण्यात आला. याच बरोबर फिल्टर प्लान्टसाठी मोटारपंप खरेदी करणे, पावसाळ्यात मुरूम टाकणे, शाळा इमारत तसेच इतर इमारतींची किरकोळ दुरूस्ती करणे, इंदिरा गांधी चौकातील भूमापन क्रमांक २१९३, २१९४, २१९५ क्षेत्रावर शॉपींग सेंटर निर्माण करणे, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामे निश्चित करणे आदी विकासात्मक ठरावांना मंजुरी देण्यात आली.मुख्याधिकाऱ्यांवर नगरसेवकांचा रोषमुख्याधिकारी हे नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांना विचारात न घेताच स्वत:च्या मनमर्जीने नगर पालिकेचा कारभार हाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप सर्वसाधारण सभेत बहुतांश नगरसेवकांनी केला.नगरसेवक गुलाब मडावी यांच्याबाबत मागील प्रोसिडींगमध्ये अपमानजनक मजकूर लिहिण्यात आला आहे. यावर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदविला. सर्वसाधारण सभा झाल्याच्या दिनांकापासून जवळपास १० दिवसांच्या आत प्रोसिडींग देणे आवश्यक असताना सरळ दुसºया सर्वसाधारण सभेच्या वेळी प्रोसिडींग दिली जात असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.