शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची प्रक्रिया आणखी किचकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:55 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जातील माहिती आणि बँकांकडे असलेली त्या शेतकºयांची ....

ठळक मुद्देबँकांपुढे पेच : ६६ तक्त्यात द्यावी लागणार शेतकºयांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जातील माहिती आणि बँकांकडे असलेली त्या शेतकºयांची माहिती याची पडताळणी केल्यानंतरच कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकºयाला पात्र ठरविले जाणार आहे.शेतकºयांकडील दीड लाखांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यानंतर त्यासाठी कोण-कोणते शेतकरी पात्र ठरू शकतात याची मोठी नियमावली आधीच बँकांना पाठविण्यात आली. त्यानुसार जे शेतकरी कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र ठरू शकतील अशांची सविस्तर माहिती शासनाकडे सादर करण्यास बँकांना सांगण्यात आले. त्यात सुरूवातीला प्रत्येक कर्जदार शेतकºयाशी माहिती ३४ कॉलममध्ये मागविण्यात आली होती. नंतर त्यात वाढ करून ५४ कॉलममध्ये माहिती मागविण्यात आली. आता २८ आॅगस्टला त्यात पुन्हा वाढ करून ६६ कॉलममध्ये माहिती सादर करण्यास सांगितले आहे.या माहितीत शेतकºयासोबत त्याच्या परिवाराची माहिती, आधार क्रमांक, गावांचा पीन कोड, कर्जदार मरण पावला असल्यास वारसदारांची माहिती अशी तब्बल ६६ प्रकारची माहिती भरायची आहे. बँकांसाठी हे काम अतिशय किचकट आणि डोकेदुखीचे झाले आहे. या माहितीत गरज नसताना शेतकरी कोणत्या प्रवर्गातील (एससी/एसटी) आहे याचीही माहिती मागितली आहे.जिल्ह्यात ३४ हजार ४२७ कर्ज थकबाकीदार शेतकरी आहेत. याशिवाय नियमित कर्जची परतफेड करणारे शेतकरी वेगळे आहेत. त्या सर्वांची माहिती शासनाने दिलेल्या तक्त्यानुसार तयार करून ती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २८ हजार शेतकºयांची माहिती तयार झाली असल्याची माहिती लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली.अशी होईल पडताळणीथकबाकीदार आणि नियमित कर्ज भरणारे अशा सर्व शेतकºयांची माहिती बँकांना ६६ कॉलमच्या एक्सेल शिटमध्ये भरून ‘आपले सरकार’ या सरकारी पोर्टलवर टाकायची आहे. याशिवाय शेतकरी आॅनलाईन पद्धतीने कर्जमाफीसाठी अर्ज करताना आपली माहिती सादर करतील. बँकांनी पाठविलेली माहिती आणि शेतकºयांनी अर्जासोबत जोडलेली माहिती याची पडताळणी करून ती माहिती जुळत असेल तरच त्या शेतकºयाला कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र ठरविले जाणार आहे. थकबाकीदार शेतकºयांकडे ९४ कोटी रुपये थकित आहेत.डिसेंबरनंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभशासनाने कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी लादलेल्या अटी, हवी असलेली माहिती गोळा करून ती विशिष्ट तक्त्यानुसार भरून पाठविणे, त्यांची पडताळणी करणे या कामासाठी किमान पुढील दोन ते तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या आधी कर्जमाफीचा लाभ पदरी पडणे कठीण आहे.प्रत्येक पात्र शेतकºयाला दीड लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र ज्यांच्याकडे दीड लाखापेक्षा जास्त रक्कम थकित आहे त्यांना दीड लाखाच्या वरील सर्व थकीत रक्कम आधी भरावी लागणार आहे. त्याशिवाय कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही हे विशेष.