शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘जीबी’त गाजला रस्त्याच्या कामातील बोगसपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:38 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी धानोरा तालुक्यातील रस्त्याच्या कामात कंत्राटदार व अभियंत्याने मिळून काढलेल्या बोगस कामाच्या बिलाचा मुद्दा चर्चेत राहिला. पेंढरीचे जि.प. सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी उपस्थित केलेल्या या मुद््यावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

ठळक मुद्देचौकशीचे आदेश : निलंबित अभियंत्याच्या बिलावर सह्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी धानोरा तालुक्यातील रस्त्याच्या कामात कंत्राटदार व अभियंत्याने मिळून काढलेल्या बोगस कामाच्या बिलाचा मुद्दा चर्चेत राहिला. पेंढरीचे जि.प. सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी उपस्थित केलेल्या या मुद््यावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय इतर जि.प.सदस्यांनी विविध मुद््यांवर मागण्या केल्या.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला सर्व सभापती आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल अनुपस्थित होते. त्यांची जबाबदारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सांभाळली.या बैठकीत जि.प.सदस्य दुलमवार यांनी धानोरा तालुक्यात झालेल्या ढोरगट्टा, खरगी, पयडी या रस्त्याच्या खडीकरणाच्या कामातील गैरप्रकार चव्हाट्यावर आणला. १६ लाख ६७ हजारांच्या या खडीकरणाच्या कामावर केवळ ५०-५० ट्रीप मुरूम टाकून १० लाख रुपयांचे बिल काढण्यात आले. उपविभागीय अभियंता रूपारेल सुटीवर असताना प्रवारी अभियंता शिरपूरकर यांनी हे बिल मंजूर केले. एवढेच नाही तर तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता बेंडकुले यांनीही शहानिशा न करता त्या बिलावर सही केल्याचा आरोप दुलमवार यांनी केला. वास्तविक शिरपूर हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते पण त्यांचे निलंबन व्हायचे असताना त्यांनी मागील तारखांमध्ये बिल काढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी जि.प.सदस्य अतुल गण्यारपवार, अ‍ॅड.राम मेश्राम यांनी केली. त्यामुळे अध्यक्षांच्या सूचनेनुसार चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आश्वासन विद्यमान कार्यकारी अभियंत्यांनी दिले.जिल्हा निधीच्या कामांत एकाच कंत्राटदाराला २० कामे दिल्याचाही मुद्दा दुलमवार यांनी मांडला. तसेच रोजगार सेवकांना ५ वर्षांपासून प्रवास भत्ता व अल्पोपहार भत्ता नाही, १ वर्षांपासून मानधन नाही. त्याबाबत जाब विचारला असता निधीअभावी ही समस्या होती. मात्र आता निधी आला असून भत्ते, मानधन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी अतुल गण्यारपवार यांनी जि.प. क्षेत्रात घरकुलांसाठी पैसे नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच गणपूर आणि जामगिरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, लखमापूर व कोनसरी येथे वाढीव पाणी पुरवठा योजना आणि उमरी, रशमीपूर येथे बंधारे देण्याची मागणी केली. याशिवाय चामोर्शीतील जि.प. केंद्र शाळेला एक वर्गखोली मंजूर झाली तरी आणखी एका खोलीची गरज असून ती मंजूर करण्याची मागणी केली.राम मेश्राम यांनी अंगणवाड्यांना बोगस आहार पुरवठा केला जात असून पुरवठ्याच्या कंत्राटाची प्रक्रिया नव्याने करण्याची मागणी केली.