गडचिरोली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला मंगळवारी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. यानिमित्त केंद्र सरकारच्या अच्छे दिनची पहिली पुण्यतिथी अहेरी, आरमोरी, कुरखेडा व धानोरा येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर कडाडून टीका केली व लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या सरकारचा भंडाफोड केला.अच्छे दिन आणण्याचा वादा करुन देशाची फसवणुक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहेरी तालुका काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. त्यानिमित्त मंगळवारी आलापल्ली येथील वीर बाबुराब चौकात तालुकाध्यक्ष महेबुब अली यांच्या नेतृत्वात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आलापल्लीचे ग्रा. पं. सदस्य सलीम शेख यांनी ‘अच्छे दिन’च्या बॅनरवर फुलमाला अर्पन करुन व अगरबत्ती लावून प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला. यावेळी ग्रा. पं. सदस्य सलीम शेख, राकाँचे ग्रा. पं. सदस्य कैलास कोरेत, बाबुराव कोहळे, सत्तार कुरेशी, सलीम भाई, रेखा येरमे, वसीम कुरेशी, फिरोज भाई, किरण कोठारे, बिस्मिल्लाह शेख, कालेखाँ कुरेशी, ईसरायील शेख आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.कुरखेडा येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बाजार चौकात अच्छे दिनच्या पहिल्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध जनविरोधी योजनांचा निषेध करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवनपाटील नाट, पं. स. सभापती शामिना उईके, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, काँग्रेसचे उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी सरपंच आशा तुलावी, जयश्री धाबेकर, रोहीत धवळे, आनंदराव जांभुळकर, अविनाश डोंगरे, सिराज पठाण, सरपंच जनाबाई उसेंडी, उपसरपंच दामोदर वट्टी, तुकाराम मारगाये, धरमदास उईके, अमोल पवार, सुभाष नैताम, सरपंच संजय कोरेटी, विमल हलामी, सिंधू तितीरमारे, सरिता पोटावी, तानाबाई मानकर, शांताबाई अलामे, यशवंत उईके, हेमंत राऊत, ईश्वर रामकेशर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.धानोरा येथेही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अच्छे दिनची पुण्यतिथी साजरी केली. तेथे मिलिंद किरंगे, देवानंद भेंडारे, भास्कर सोनुले, नरेश भैसारे, प्रशांत कोराम, पुरुषोत्तम ढवळे आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला. आरमोरी येथील गांधी चौकात मोदी सरकारची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी युथ काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत मोटवानी, राजू गारोदे, प्रदेश सचिव आशुतोष बागडे, नंदू खानदेशकर, लॉरेंस गेडाम, सौरभ जक्कनवार, प्रवीण रहाटे, पंकज फुलबांधे, केतन घोसे, तिवारी, साहिल कासवानी, शेषराव कुंभारे, रामदास उईके, क्रिष्णा मट्टे, राजेश्वर होकम, रंजीत जंगम यांच्यासह आरमोरी तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अहेरी, आरमोरी व कुरखेडात केंद्र सरकारची पुण्यतिथी
By admin | Updated: May 27, 2015 01:41 IST