शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:37 IST

येथील ग्रामीण रूग्णालयात कर्तव्यावर असताना रूग्णाच्या नातेवाईकांसोबत बाचाबाची झाली असता त्याचा वचपा काढण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णालयातील स्वच्छता कर्मचाºयावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना १९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदेसाईगंजातील घटना : ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाºयांचे कामबंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : येथील ग्रामीण रूग्णालयात कर्तव्यावर असताना रूग्णाच्या नातेवाईकांसोबत बाचाबाची झाली असता त्याचा वचपा काढण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना १९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपी शपू पठाण याला देसाईगंज पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातून २० जानेवारीला सायंकाळी अटक केली.मुरलीधर राधेश्याम दिवटे(स्वच्छता सेवक) असे हल्ला झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. वैद्यकीय अधिकारी हे रूग्णांना तपासण्यासाठी येणार असल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना वार्डातून बाहेर निघण्याची विनंती दिवटे यांनी शनिवारी सकाळच्या सुमारास केली होती. यावरूनच रूग्णाच्या नातेवाईकांसोबत शाब्दिक चकमक उडाली. दिवटे हे कर्तव्य बजावून घराकडे परत जात असताना लाखांदूर टी पार्इंटवर रूग्णाच्या नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दिवटे गंभीर जखमी झाले. त्यांना ब्रह्मपुरी येथील रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.या घटनेचा ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध करीत कामबंद २० जानेवारी रोजी कामबंद आंदोलन केले. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आरोग्य कर्मचाºयांनी व्यक्त केला. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे.