शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

दिवस धरणे आंदोलनाचा!

By admin | Updated: February 11, 2015 02:03 IST

जिल्हा केरोसीन व स्वस्त धान्य विक्रेता वेल्फेअर असोसिएशन गडचिरोली, आयटक संघटना व भारत जन आंदोलनाच्या वतीने ....

गडचिरोली : जिल्हा केरोसीन व स्वस्त धान्य विक्रेता वेल्फेअर असोसिएशन गडचिरोली, आयटक संघटना व भारत जन आंदोलनाच्या वतीने मंगळवारी विविध मागण्यासंदर्भात अनेक ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची काही प्रमाणात तारांबळ उडाली. एकूणच आजचा मंगळवार दिवस जिल्हाभरात धरणे आंदोलनाचा दिवस ठरला.गडचिरोली जिल्हा केरोसीन व स्वस्त धान्य विक्रेता वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी व देसाईगंज येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, केरोसीन नियतन वाढविण्यात यावा, रेशन दुकानाचे भाडे व दोन नोकरांचा पगार व वीज बिलची रक्कम शासनाने द्यावी, रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचविण्याचा खर्च देण्यात यावा, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण रेशन व केरोसीन दुकानातून व्हावे, एपीएलधारकांच्या धान्याचे बंद केलेले वितरण पुन्हा सुरू करण्यात यावे, रेशनधान्याचे कमिशन प्रती क्विंटल १०० रूपये करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. गडचिरोली येथील धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कैलाश शर्मा, अनिल मंडिया, जब्बार सरदार शेख, चंद्रकांत दरडे, चांगदास मसराम, पिंगला निलेकार, रामदास पिपरे, सुरेश बांबोळे, श्रीदेवी खंडारे, यु. आर. उंदीरवाडे, पी. पी. बांबोळे, रूमन ठाकरे, नेहा वैदवार, धनवंता बोरकर, राजेंद्र कुकडकार आदीसह गडचिरोली तालुक्यातील केरोसीन व रेशन दुकानदार सहभागी झाले होते. चामोर्शी : चामोर्शी येथील आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर वाघाडे, सचिव कमलाकर झाडे, उपाध्यक्ष गोपाल मंडल, कोषाध्यक्ष एकनाथ सातपुते, संजय वडेल्लीवार, मोहन राजापुरे, तोताजी आभारे, प्रफुल मुंगेलवार, नामदेव उंदीरवाडे, अमित यासलवार, सपना बुरांडे, नामदेव चलाख, दमयंती बांबोळे, आशा सोमनकर, कमलाकुमारी दुबे, उमेश आलुरवार, मधू पेदापल्लीवार, रिंकू पालारपवार, गजानन भांडेकर, इश्वरदास चुनारकर आदी उपस्थित होते.आरमोरी : हिरालाल येरमे, दादाजी माकडे, अनिल किरमे, रमेश सरोदे, ताराचंद कुनघाडकर, नादीर लालानी, रवी निंबेकार यांच्या नेतृत्वात आरमोरी तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी दुकानदारांनी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेमुळे दुकानदारांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही केला. देसाईगंज : येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी आरिफ पटेल, दादाजी भर्रे, अरूण कुंभलवार, राजू बुल्ले, वामन पगाडे, अमरदास बुल्ले आदीसह महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकान संचालिका व केरोसीन विक्रेते सहभागी झाले होते.