शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहीद दिनानिमित्त उसळला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:52 IST

अखिल भारतीय हलबा/हलबी आदिवासी समाज संघटना केंद्रीय कार्यालय कटंगी बुज जिल्हा शाखा गडचिरोली क्षेत्रीय संघटना मुरूमगाव यांच्या वतीने रविवारी गैदसिंह शहिद दिवसाचे औचित्य साधून गैदसिंह व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण व मेळाव्याचे आयोजन मुरूमगाव येथे करण्यात आले होते.

ठळक मुद्दे३० हजारांवर नागरिकांची हजेरी : मुरुमगावात गैदसिंह व बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कमुरूमगाव : अखिल भारतीय हलबा/हलबी आदिवासी समाज संघटना केंद्रीय कार्यालय कटंगी बुज जिल्हा शाखा गडचिरोली क्षेत्रीय संघटना मुरूमगाव यांच्या वतीने रविवारी गैदसिंह शहिद दिवसाचे औचित्य साधून गैदसिंह व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण व मेळाव्याचे आयोजन मुरूमगाव येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला छत्तीसगड व महाराष्ट्र राज्यातील हलबा/हलबी समाजाचे जवळपास ३० हजार नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय हलबा/हलबी आदिवासी समाज राष्ट्रीय महासभेचे उपाध्यक्ष एन. डी. किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जी. आर. राणा होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, पी. आर. नाईक, बी. एल. ठाकूर, अर्जून नाग, शिवकुमार पात्र, डॉ. देवेंद्र महल्ला, कुंवरसिंह पुजारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, एन. के. चौधरी, शालिक मानकर, हिरालाल मांजी, किसन मानकर, माधवराव गावड, जे. टी. देहारी, श्यामलाल ठाकूर, बिरेंद्र मलिया, बुदीयारसिंह बारला, गिरवरसिंह ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुरूमगाव येथून ज्योत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. शहीद गैदसिंह व बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित होते. मेळाव्याला छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा, बिजापूर, कोंडागाव, बस्तर, सुकमा, कांकेर, बोलाद, राजनांदगाव, दुर्ग, महासमुंद आदी २७ जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील हलबा/हलबी समाजाचे नागरिक उपस्थित होते.मरूमगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी राजू थोरात, सचिन पोगडे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १२ गावच्या समित्यांमार्फत जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा परिषद शाळा, दखणे विद्यालय, शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यावेळी मार्गदर्शन करताना राणा यांनी हलबा/हलबी समाजातील नागरिकांनी एकजुटतेची ताकद शासनाला दाखविली पाहिजे. आपण एकजूट होऊ तेव्हाच अन्यायाचा सामना करू शकू. दुर्गम व आदिवासी भागात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक कुटुंबातील बालकाला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल. यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमादरम्यान एन. डी. किरसान व उपस्थित मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.संचालन सरादू चिराम तर आभार धानोरा पंचायत समिती सभापती अजमन राऊत यांनी मानले.