शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

‘डान्स हंगामा’नेच केले झाडीपट्टीला कलंकित

By admin | Updated: May 19, 2017 00:14 IST

दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा लाभलेल्या झाडीपट्टीला व येथील कलावंतांना दर्जेदार नाट्यप्रयोगांमुळे सुगीचे दिवस प्राप्त झाले होते.

अधिक पैसे कमावण्याचा नाद कारणीभूत : मुलीच्या फसवणूक प्रकरणावरून सिद्ध लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा लाभलेल्या झाडीपट्टीला व येथील कलावंतांना दर्जेदार नाट्यप्रयोगांमुळे सुगीचे दिवस प्राप्त झाले होते. हळूहळू कलावंतांच्या मानधनातही मोठी वाढ झाली. मात्र यानंतरही अल्पावधीत अमाप पैसा कमविण्याच्या नादात नाट्यप्रयोगापूर्वी ‘डान्स हंगामा’ ही संकल्पना अस्तित्वात आणली आणि येथेच घात झाला. त्यातूनच पैशाच्या हव्यासापायी तमाशाच्या फडात मुलींना नेऊन त्यांची विक्री करण्याचा प्रकार घडल्याने झाडीपट्टी रंगभूमी कलंकित झाली आहे. डान्स हंगामाच्या माध्यमातून डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मुलींना नाचविण्याचे काम सुरू झाले. पैशाच्या आमिषाला बळी पडून अनेक नवख्या मुलींचा शिरकाव डान्स हंगामा ग्रुपमध्ये झाला. त्यांच्या या कमजोरीचा फायदा घेऊन अश्लिल नृत्य सादर करण्यास संचालक भाग पाडू लागले. त्यामुळे कमी वेळात अधिक पैसे कमविण्याच्या नादात डान्स हंगामाच्या चक्रव्युहात सापडलेल्या मुलींची फसवणूक झाली. देसाईगंज हे झाडीपट्टी रंगभूमीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. झाडीपट्टीत समाविष्ट असलेल्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्याबाहेरही झाडीपट्टीच्या नाट्यप्रयोगांचा प्रचार व प्रसार होऊ लागला. दरम्यान झाडीपट्टी रंगभूमित अनेक नव्या नाट्य कंपन्यांना नाट्यप्रयोग सादरीकरणाची संधी मिळणे कठीण झाले. यावर मात करण्यासाठी अनेक नव्या नाट्य कंपन्यांच्या संचालकांनी डान्स हंगामासह कमी रकमेत नाट्यप्रयोग उपलब्ध करून घेणे सुरू केले. अशा कंपन्यांचा झाडीपट्टीत बोलबाला सुरू होऊन अश्लिलतेची आवड असलेले आंबटशौकिन रसिक नव्या कंपन्यांच्या नाट्यप्रयोगांकडे वळले. दरम्यान डान्स हंगामात मद्यधुंद अवस्थेतही मुली थिरकू लागल्या. येथूनच झाडीपट्टी रंगभूमीला कलंक लागण्यास प्रारंभ झाला. परिणामी झाडीपट्टीत कधी नव्हे ते गेल्या दोन-चार वर्षात जीव घेण्याच्या घटना घडल्या. काहींचे संसारही पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत. असा झाला मुलींचा तमाशा फडात शिरकाव देसाईगंज येथील ज्या महिलेने स्थानिक मुलींना सोलापूरच्या तमाशापर्यंत पोहोचविले ती पुण्याकडील तमाशा फडातूनच नाट्य कलावंत म्हणून उदयास आली. झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्य प्रयोगांचा हंगाम संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागात तमाशाचे फड सुरू होतात, याची पूर्ण जाणीव त्या महिलेला होती. नाट्यप्रयोगांचा हंगाम संपल्यानंतर डान्स हंगामात नाचणाऱ्या मुली रिकाम्या असतात व त्यांना या काळातही पैसा हवा असतो, नेमकी हिच गोष्ट हेरून पुण्याकडील तमाशा फडाच्या संचालकांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर झाडीपट्टीतील अनेक मुलींना सोबत घेऊन ती महिला तमाशा फडात जाऊ लागली. मागील चार-पाच वर्षांपासून जवळपास ३० ते ४० मुली तिकडच्या भागात जाऊन मोठ्या रक्कमा कमावून इकडे परतू लागल्या. त्यानंतर हीच बाब हेरून यावर्षी झाडीपट्टीतील नामवंत नृत्यांगणाही तमाशा फडाच्या वारीवर गेल्या होत्या. मात्र तमाशा फडाच्या खऱ्या कसोटीला येथील मुली उतरू न शकल्याने तमाशा फडाच्या संचालकांशी वाद उफाळून आला. त्यानंतर काही मुली तमाशा फडातून परत आल्या. मात्र काहींच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना पैसे कमविण्याच्या नादात तिकडेच थांबण्यास भाग पाडले. गांभीर्याने चौकशी करणे गरजेचे तमाशा फडात नेमक्या किती मुली थिरकल्यात हे सांगणे अद्यापही कठीण आहे. पुणेकडील भागात तमाशाच्या फडात काम करते म्हणून झाडीपट्टीतील किती मुली गेल्या, त्या कोणाच्या माध्यमातून गेल्या, या बाबतच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यात आहे. सदर प्रकरणाची गांभीर्याने सखोल चौकशी केल्यास सत्य उजेडात येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र तमाशा फडात गेलेल्या मुलींंसोबत घडलेल्या प्रकारामुळे झाडीपट्टी रंगभूमी पुरती हादरली आहे, हे मात्र खरे.