शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपांवरील मनमानी ठरणार धोकादायक!

By admin | Updated: December 29, 2014 23:44 IST

पेट्रोलसारख्या अतिज्वलनशील पदार्थाची हाताळणी करताना अतिशय काळजी घ्यावी लागते. पण याच पेट्रोलचा हजारो लिटरचा साठा ज्या ठिकाणी असतो त्या पेट्रोल पंपांवर मात्र सुरक्षेच्या नियमांच्या

मोबाईलबंदीचा फज्जा : खुलेआम मिळते बाटली-डपकीत पेट्रोल, नियमांची पायमल्लीमनोज ताजने/नरेश रहिले - गोंदियापेट्रोलसारख्या अतिज्वलनशील पदार्थाची हाताळणी करताना अतिशय काळजी घ्यावी लागते. पण याच पेट्रोलचा हजारो लिटरचा साठा ज्या ठिकाणी असतो त्या पेट्रोल पंपांवर मात्र सुरक्षेच्या नियमांच्या अक्षरश: चिंधड्या उडविल्या जात आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हा प्रकार स्पष्टपणे दिसून आला. गोंदियातील कोणत्याच पेट्रोल पंपावर पेट्रोलियम कंपन्यांच्या ‘मार्केटिंग गाईडलाईन्स’चे पालन केल्या जात नाही. याला वेळीच आळा घातला नाही तर ही बाब भविष्यातील एखाद्या मोठ्या अपघातासाठी कारणीभूत ठरण्याची दाट शक्यता आहे.दिवसागणिक दुचाकी-चारचाकी वाहनांची संख्या सर्वत्र वाढत आहे. त्यासोबतच पेट्रोल-डिझेलची मागणीही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांची संख्याही गेल्या ४-५ वर्षात झपाट्याने वाढली आहे. पण पेट्रोल पंप चालविताना त्यासाठी असलेल्या नियमावलीचे पालन कोणीच करताना दिसत नाही. त्यामुळे पेट्रोल पंपावर एखादा अपघात झाल्यास किंवा नियमबाह्यपणे विकल्या जाणाऱ्या खुल्या पेट्रोलचा दुरूपयोग झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन मुख्य कंपन्यांचे पेट्रोल पंप जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. या तीनही कंपन्या सरकारच्या नियंत्रणाखाली चालतात. त्यामुळे त्या कंपन्यांच्या पेट्रोल पंपांसाठी काही मार्गदर्शन तत्वे (मार्केटिंग गाईडलाईन्स) देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन होत आहे किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी त्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर असते. मात्र ज्या पद्धतीने त्या नियमांचे पायमल्ली केली जात आहे त्यावरून पेट्रोल पंपांची तपासणी होतच नसल्याचे दिसून येत आहे.‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये गोंदिया शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या अग्रसेन गेटजवळील भारत पेट्रोलियम, वर्दळीच्या जयस्तंभ चौकातील हिन्दुस्थान पेट्रोलियमसह आमगाव मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपवर पाण्याच्या बॉटलमध्ये खुलेआम पेट्रोल खरेदी केले. मात्र कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही किंवा त्या बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास आढेवेढे घेतले नाही. यावरून तेथील कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने वाहनाशिवाय पेट्रोल देता येत नाही या नियमाची जाणीव आहे की नाही, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.