शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मेणाच्या डोळ्यांमुळे बिघडले सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:12 IST

शिल्पकलेचा अप्रतीम नमूना ठरावा, अशी मूर्ती वैरागड येथे आहे. मात्र काही वर्षांपूर्वी या मूर्तीला बाजारात विकत मिळणारे मेणाचे डोळे लावण्यात आले आहे. त्यामुळे या मूर्तीच्या सौंदर्यावर परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देसौम्य स्वभावाची मूर्ती : वैरागडातील आदीशक्तीच्या रूपावर परिणाम

प्रदीप बोडणे।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : शिल्पकलेचा अप्रतीम नमूना ठरावा, अशी मूर्ती वैरागड येथे आहे. मात्र काही वर्षांपूर्वी या मूर्तीला बाजारात विकत मिळणारे मेणाचे डोळे लावण्यात आले आहे. त्यामुळे या मूर्तीच्या सौंदर्यावर परिणाम झाला आहे.आरमोरी तालुकास्थळापासून १५ अंतरावर वैरागड हे गाव आहे. या ठिकाणी ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वराचे मंदिर, इदगाह, गोरजाई मंदिर व हेमाडपंथी मंदिरे आहेत. ३० वर्षांपूर्वी वैरागड येथील सीताराम क्षिरसागर यांना त्यांच्या शेतात खोदकाम करताना पाच फूट उंचीची मूर्ती आढळून आली. एकाच दगडावर कोरलेल्या या सुंदर मूर्तीची माहिती तत्कालीन जिल्हाधिकारी गौतम यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी स्वत: वैरागडला येऊन मूर्ती वस्तू संग्रहालयात पाठविण्याची तयारी दर्शविली. मात्र गावातील नागरिकांनी विरोध करून त्याच ठिकाणी छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठास्थापना केली. आदीशक्ती असे नामकरण केले. तेव्हापासून स्थानिक नागरिक या मूर्तीला आदीशक्ती याच नावाने संबोधतात. पुरातत्त्व विभागाच्या मतानुसार सदर मूर्ती तारकेश्वरी देवीच्या मूर्तीप्रमाणे दिसत असल्याचा निष्कर्ष आहे.मूर्तीच्या शेष भागात सुंदर नक्षीकाम काम केले आहे. मुकूट, कर्णकुंडल, मिटलेले ओट, अर्ध मिटलेले डोळे आणि गोलाकार भुवया यामुळे मूर्ती नम्रपणे पहात असल्याचा भास होतो. पण या मूर्तीला काही वर्षांपूर्वी मेणाचे डोळे लावण्यात आले. त्यामुळे मूर्तीचे स्वरूप एकदम आक्रमक स्वभावाप्रमाणे दिसते. मेणाच्या डोळ्यांमुळे मूर्तीचे मूळ स्वरूपच बदलले आहे. मूर्तीच्या वक्षस्थानापासून खालपर्यंत रेखीव माळ आहे. एका हातात डमरू, दुसऱ्या हातात त्रिशूल आहे. पायात चाळ घातल्या आहेत. एखाद्या सौंदर्यवती महिलेने अलंकार परिधान करावा, याप्रमाणे विविध अलंकाररूपी नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिरामुळे ऊन, वारा व पावसापासून मूर्तीचे रक्षण होत आहे. मात्र मूर्तीवर अभिषेक व पूजेचे साहित्य टाकले जात असल्यामुळे सौंदर्य नष्ट होत आहे. मूर्तीचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी भाविकांनीही अभिषेक करू नये.