शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी प्रगणकांचा जीव धोक्यात

By admin | Updated: May 24, 2016 01:35 IST

वन्यप्राणी संरक्षण व गणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एफडीसीएमने मचान तयार करून दिले नाही.

जोगीसाखरा : वन्यप्राणी संरक्षण व गणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एफडीसीएमने मचान तयार करून दिले नाही. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांना तलावाच्या पाळीवर रात्री थांबून गणना करावी लागत आहे. हिंस्त्र प्राण्यांपासून त्यांच्या जीवाला धोका असला तरी एफडीसीएमचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. होळी व बुद्ध पौर्णिमा या दोन रात्री सर्वाधिक चंद्रप्रकाश राहत असल्याने वन्यप्राण्यांची गणना करण्यासाठी या रात्री अतिशय अनुकूल माणल्या जातात. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास तलावावर पाणी पिण्यासाठी येत असल्याने वन विभागाचे दहा कर्मचारी रात्रीच्या सुमारास पाहारा देऊन त्यांचे वन्यजीव तस्करांपासून संरक्षण करतात. या कामासाठी १५ फूट उंच असलेली मचान तयार करणे आवश्यक आहे. प्रत्येक मचानीवर दोन मजूर ठेवले जातात. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री कराडी येथील जंगलातील बांधावर लोकमत प्रतिनिधीने रात्री १२ वाजता भेट दिली असता, वनपाल एन. आर. जांभुळकर, वनरक्षक आर. एम. सोयाम, जी. आय. उईके, वाघमारे, वनमजूर के. के. पाल, डब्ल्यू. आर. हाळगे हे प्राणी गणना करीत होते. मात्र संरक्षणाच्या दृष्टीने त्याठिकाणी मचान तयार करण्यात आली नव्हती. वन्य संरक्षणासाठी वन विभाग व एफडीसीएमला कोट्यवधी रूपयांचा निधी शासनाकडून प्राप्त होतो. मात्र सदर निधी कागदावरच खर्च केला जात असल्याचे यावरून सिद्ध होत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)