शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यामुळे संरक्षक भिंतीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा अंतर्गत कढोलीजवळून वाहणाऱ्या सती नदीवरील पुलाच्या लगतचा भाग पावसाळ्यात वाहून गेला. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. पूल आणि संरक्षक भिंत यांच्यामधील पोकळी बुजविण्यासाठी नदीकाठावरची माती खोदून ती त्या पोकळीमध्ये टाकण्यात आली. खालची माती गेल्याने आता संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे दरड खोदून टाकली माती : पुलाजवळील संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : पूल व संरक्षक भिंत यांच्यामध्ये पडलेली पोकळी बुजविण्यासाठी कंत्राटदाराने काठाच्या बाजूची नाली खोदून खड्डा तयार केला आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा अंतर्गत कढोलीजवळून वाहणाऱ्या सती नदीवरील पुलाच्या लगतचा भाग पावसाळ्यात वाहून गेला. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. पूल आणि संरक्षक भिंत यांच्यामधील पोकळी बुजविण्यासाठी नदीकाठावरची माती खोदून ती त्या पोकळीमध्ये टाकण्यात आली. खालची माती गेल्याने आता संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे. ज्या मातीवर संरक्षक भिंत उभी आहे, त्या ठिकाणी खड्डा पाडल्याने पुढे नदीच्या पाण्यामुळे उर्वरित मातीही वाहून जाणार आहे. त्यामुळे सदर संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे कंत्राटदाराने संरक्षक भिंतीच्या खालची माती उपसण्याची काहीच गरज नव्हती. पोकळीच्या ठिकाणी मुरूम टाकणे आवश्यक होते. मात्र थातुरमातूर काम उरकण्यासाठी त्याच ठिकाणची माती टाकली आहे. माती खोदल्यामुळे संरक्षक भिंतीला धोका पोहोचणार आहे. ही बाब सामान्य नागरिकाच्या लक्षात येते, तर अभियंत्यांना कसे समजत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पुलाजवळची माती खोदल्याने भविष्यात पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.शिवकालीन बंधाऱ्याने केले पात्राचे नुकसानकढोली पुलाच्या खालच्या भागातच शिवकालीन बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला. या बंधाऱ्याचा काहीच फायदा झाला नाही. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला जवळपास २५ एकर नदीकाठाचा भूभाग वाहून गेला आहे. त्यामुळे नदीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा अशा पद्धतीने चुकीचे काम करीत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. बहुतांश ठिकाणचा नदीकाठ नदीबरोबर झाला आहे.नदी हा अतिशय संवेदनशील विषय आहे. नदीतील रेतीचा जास्त प्रमाणात उपसा झाल्यास पर्यावरणाला धोका होऊ शकते. त्यामुळे नदीपात्राची पाहणी केल्याशिवाय घाट मंजूर केला जात नाही. कोणत्याही पुलाजवळ रेतीघाट मंजूर होत नाही. सरकारी यंत्रणा मात्र कोणताही विचार न करता कामे करून घेत आहे. नदीघाटावरील माती उपसणे हा अतिशय गंभीर प्रकार असून संबंधित कंत्राटदारावर किंवा अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग