शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने अहेरी तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:39 IST

अहेरी तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला. यामध्ये तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी केली आहे.

ठळक मुद्देआलापल्ली व गुड्डीगुडम गावांना फटका : जि.प. उपाध्यक्ष व बांधकाम सभापतींनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/आलापल्ली : अहेरी तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला. यामध्ये तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी केली आहे.आलापल्ली येथील २० घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जवळपास ५० घरांचे अंशत: नुकसान झाले. गोंडमोहल्ला, पुनागुडम, मल्लेवार कॉलनी, बजरंग चौक, वन वसाहत तसेच बसस्थानक परिसरातील नागरिकांच्या कवेलु व टिनाचे पत्रे घरावरून उडाल्याने घरातील वस्तू, उपकरणे पावसामुळे ओले झाले. आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे यांनी वन वसाहतीची पाहणी केली. टिन उडून जात असल्याची तक्रार केली. गोंड मोहल्ला, पुनागुडम तसेच इतर वार्डात जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, सरपंच सुगंधा मडावी, सदस्य संतोष तोडसाम, दिलीप गंजीवार, जुलेख शेख यांनी पाहणी केली. मदतीसंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन जि.प. उपाध्यक्षांनी केले. गुरूवारीही काही वार्डातील वीज पुरवठा बंदच होता.अहेरी तालुक्यातील सिरोंचा मार्गावरील गुड्डीगुडम येथीलही घरांचे मोठे नुकसान झाले. जि.प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी पाहणी केली. सारय्या भिमा मडावी, नामदेव धर्मा मडावी यांच्या घरावरचे छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले. निमलगुडम येथील बिच्छु पोट्टी आत्राम, दिवाकर सडमेक, वैनकतेश शिरलावार यांच्याही घरांना भेट देऊन पाहणी केली. काही घरांवर विजेचे तार तुटून पडल्याने नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तारा सुरळीत करण्याचे निर्देश वीज विभागाला दिले.