शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

जंगली हत्तींकडून पुंजण्यांसह घरांचेही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:00 IST

२२ जंगली हत्तींचा कळप शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डोंगरगाव हलबी रस्त्याने पळसगाव परिसरात आला. रात्रभर मुक्काम करून घराशेजारील वाड्या, धानाचे पुंजणे तसेच घरांचेही नुकसान केले. हत्तींच्या कळपाने देवराव उरकुडे यांच्या घराचे नुकसान केले. तसेच घरालगत असलेला भाजीपाला, परसबाग उद्ध्वस्त केली. पहाटे ४ वाजेपर्यंत नासधूस सुरूच हाेती. 

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गेल्या काही दिवसांपासून  धानाेरा, कुरखेडा, देसाईगंज तालुक्यात उच्छाद मांडणाऱ्या जंगली हत्तींच्या कळपाने पळसगाव  परिसरात येऊन धानाच्या पुंजण्यांसह घरांचेही नुकसान केले. या परिसरात हत्तींनी मुक्काम ठोकल्याने भीतीमुळे लोकांनी रात्र जागून काढली. सध्या पाथरगाेटा परिसरात हत्तींचा वावर आहे.२२ जंगली हत्तींचा कळप शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डोंगरगाव हलबी रस्त्याने पळसगाव परिसरात आला. रात्रभर मुक्काम करून घराशेजारील वाड्या, धानाचे पुंजणे तसेच घरांचेही नुकसान केले. हत्तींच्या कळपाने देवराव उरकुडे यांच्या घराचे नुकसान केले. तसेच घरालगत असलेला भाजीपाला, परसबाग उद्ध्वस्त केली. पहाटे ४ वाजेपर्यंत नासधूस सुरूच हाेती. याशिवाय पाथरगोटा येथील नामदेव करांकर यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यांची नासाडी केली. बाबूराव मने यांच्या शैतातील बोरवेलचे पाइप  फोडले, बाळकृष्ण नखाते, आत्माराम नाकतोडे, तिमाजी बनकर, दुधराम हजारे, केशव उरकुडे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील उडीद, मूग, तका, तूर पिकांचे नुकसान केले. सध्या हा कळप पाथरगोटा तलावालगत जंगल परिसरात असल्याची माहिती आहे.  वनविभागाने परिसरातील लोकांना सावध करून जंगलात जनावरे  चारण्यासाठी जाऊ नये, अशी सूचनाही दिली आहे. जंगली हत्तींच्या कळपाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी राकाँचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर, काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम व सरपंच जयश्री दडमल यांच्यासह शेतकऱ्यांनी वनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या जवळपास दाेन महिन्यांपासून जिल्ह्यात वावरत असलेल्या जंगली हत्तींच्या कळपाने आतापर्यंत धानाेरा, कुरखेडा आणि देसाईगंज तालुक्यात नुकसान केले आहे. यापुढे ते कुठे जाणार, असा प्रश्न पडला आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभागagricultureशेती