शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तींची कामे दलित वस्ती क्षेत्राबाहेर

By admin | Updated: August 10, 2014 22:58 IST

जोगीसाखरा गट ग्रामपंचायतंतर्गत असलेल्या सालमारा येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता व जोगीसाखरा येथे नाली बांधकाम मंजूर करण्यात आले.

जोगीसाखरा : जोगीसाखरा गट ग्रामपंचायतंतर्गत असलेल्या सालमारा येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता व जोगीसाखरा येथे नाली बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र संबंधीत विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराने सदर दोन्ही कामे दलित वस्ती क्षेत्राबाहेर सुरू केली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संबंधीत दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सालमारा येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ३ लाख रूपयाच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र ज्या ठिकाणी सदर रस्त्याचे काम सुरू आहे. तेथे दलित समाजाचा एकही घर नाही. तसेच ग्रामपंचायतीचा रस्ता देखील नाही. वनविभागाच्या मोकळ्या जागेवर अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून दलितांच्या हक्काचा निधीची वाट लावली जात असल्याचा आरोप सालमारा येथील नागरिकांनी केला आहे. जोगीसाखरा येथे ४ लाख ७५ हजार रूपयाच्या निधीतून ९५ मिटर अंतराचे नाली बांधकाम सुरू करण्यात आले. सदर काम दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत घेतले असले तरी दलित वस्ती व नाली बांधकामाचा मुळीच संबंध नाही, असेही नागरिकांनी म्हटले आहे. (वार्ताहर)