शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

ढोलडोंगरी येथे चार लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:18 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढोलडोंगरी येथूून ३ लाख ६७ हजार २०० रूपयांची दारू जप्त केली आहे.

ठळक मुद्देदोघे ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढोलडोंगरी येथूून ३ लाख ६७ हजार २०० रूपयांची दारू जप्त केली आहे.कोटगूल पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या ढोलडोंगरी येथील एका घरात दारूचा साठा ठेवला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बुधवारी बडीमादे येथील उदेसिंग सोनू हारामी याला विश्वासात घेऊन ढोलडोंगरी गाठले. ढोलडोंगरी येथील रामलाल पुसाजी जनबंधू याच्या घरी दारूचा साठा ठेवण्यात आला होता. त्या घराची चौकशी केली असता, या घरात ३ लाख २१ हजार रूपये किंमतीची विदेशी दारू आढळून आली. तर ३६ हजार रूपये किंमतीच्या ५०० मिली क्षमतेच्या बॉटल असलेले बॉक्स आढळून आले. असा एकूण ३ लाख ६७ हजार २०० रूपये किंमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. सदर दारू निर्मल धमगाये याच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी उदेसिंग सोनू हारामी व रामलाल पुसाजी जनबंधू या दोघांना ताब्यात घेतले आहे. निर्मल धमगाये याच्या विरोधात कोरची पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरची तालुक्यातीलच कुमकोट येथे जानेवारी महिन्यात धमगाये याची ६० लाख रूपयांची दारू पोलिसांनी जप्त केली होती.

टॅग्स :liquor banदारूबंदी