शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यावर दबावप्रकरणी दुग्धविकासमंत्री जानकर निर्दोष, व्हिडीओ झाला होता व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 19:51 IST

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील तालुका न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांची मंगळवारी (दि.३०) निर्दोष मुक्तता केली आहे.

देसाईगंज (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील तालुका न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांची मंगळवारी (दि.३०) निर्दोष मुक्तता केली आहे. नगर परिषद निवडणुकीदरम्यान विशिष्ट निवडणूक चिन्ह देण्यासाठी फोनवरून दबाव आणल्याच्या या प्रकरणाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. त्यानंतर जानकर व मोटवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या देसाईगंज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान ना.महादेव जानकर यांनी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या घरून निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर नान्हे यांना फोन करून प्रभाग ९ ब मध्ये पंजा चिन्ह गोठवून ‘कपबशी’ हे चिन्ह द्यावे असे सांगितल्याचा व्हिडीओ गाजला होता. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दखल घेऊन दि.१० डिसेंबर २०१६ ला प्रभाग ९ ब ची निवडणूक रद्द ठरवून जानकर व मोटवानी यांच्याविरूद्ध लोकसेवकाला त्यांच्या कायदेशीर कृत्य करताना त्याच्यावर दबाव आणल्याप्रकरणी भादंवि १६६ तसेच भादंवि १८६ कलमानुसार तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २२ (६) नुसार देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात जानकर यांनी तीन वेळा देसाईगंज न्यायालयात हजेरी लावली. सोमवार दि.२९ जानेवारीला अंतिम युक्तीवादादरम्यानही जानकर यांनी देसाईगंज न्यायालयात न्यायाधीश के.आर. सिंघेल यांच्यासमोर हजेरी लावली. मंगळवारी सबळ पुराव्याअभावी महादेव जानकर आणि जेसा मोटवानी यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने अ‍ॅड.मनोज साबळे नागपूर व अ‍ॅड.मंगेश शेंडे देसाईगंज यांनी तर सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.फुले यांनी काम पाहिले.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकर