शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 14:00 IST

देसाईगंज नगर पालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक चिन्हासंदर्भात फोनवरून दबाव आणल्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्देदेसाईगंज न्यायालयात लावली हजेरी

आॅनलाईन लोकमतगडचिरोलीदेसाईगंज नगर पालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक चिन्हासंदर्भात फोनवरून दबाव आणल्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला.गडचिरोली जिल्ह्यातील सर्वांत पहिली नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाºया देसाईगंज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीदरम्यान दुग्धविकास मंत्री नामदार महादेव जानकर यांनी देसाईगंज येथील माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या घरून देसाईगंज नगर पालिका निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर नान्हे यांना फोन करून प्रभाग ९ ब मध्ये पंजा चिन्ह गोठवून कप बशी देण्याबाबत प्रकरणाचा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होऊन गाजला होता. याबाबत महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दखल घेऊन प्रभाग ९ ब ची निवडणूक रद्द ठरवून निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नामदार महादेव जानकर व देसाईगंज येथील जेसा मोटवानी यांच्या विरूद्ध लोकसेवकाला त्यांच्या कायदेशीर कृत्य करताना त्याच्यावर दबाव आणल्याने भादंवि १६६ तसेच भादंवि १८६ नुसार कायदेशीर कर्तव्य पार पाडत असताना अडथळा निर्माण करणे तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औधोगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २२(६) नुसार गुन्हा दाखल करण्यात केला होता. याबाबत दुग्धविकास मंत्री महादेव जानकर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता देसाईगंज येथील न्यायालयात न्यायाधीश के. आर. सिंघेल यांच्या समोर हजेरी लावली. त्यांना १५ हजार रु पयाच्या जमानतीवर जमानत मंजूर करण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालय