शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दीनदयाल उपाध्याय यांचे छायाचित्र शोधताना दमछाक

By admin | Updated: September 27, 2015 01:07 IST

भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते, थोर विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे छायाचित्र शोधताना अनेक शासकीय...

कोण हे नेते? : अनेक अधिकारी, कर्मचारी विचारत होतेगडचिरोली : भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते, थोर विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे छायाचित्र शोधताना अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजवर ज्या नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी केली जात होती, त्यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाचा कधीही फारसा सरकारीस्तरावरून नामोल्लेख झाला नाही. अनेकांना त्यांच्या जयंतीची तारीखही माहीत नव्हती. सरकारी परिपत्रक आल्यामुळे जयंती साजरी करायची आहे, याची कल्पना अनेक अधिकाऱ्यांनी आली. आपल्या कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा फोटोही नाही, ही बाब लक्षात आल्यावर फोटो तयार करण्याची हालचाल सुरू झाली. पंडित दीनदयाल उपाध्याय नेमके कोणते यासाठी अनेकांकडे विचारणा होऊ लागली. नेमका त्यांचा योग्य फोटोच तयार झाला पाहिजे, याची काळजीही अधिकाऱ्यांमध्ये दिसून आली. अनेक कार्यालयाचे कर्मचारी याबाबत एकमेकांकडे चौकशी करताना दिसून आले. काँग्रेस राजवटीच्या काळात जनसंघाच्या या नेत्याची सरकार दफ्तरी जयंती साजरीच होत नव्हती. त्यामुळे त्यांच्या कार्याचीही अनेकांना माहिती नव्हती. काहींनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून दीनदयाल उपाध्याय यांचे छायाचित्र कार्यक्रमासाठी जमवून घेतले, अशी चर्चा आहे. एकूणच काही का होईना, परंतु दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करताना प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे अधिकाऱ्यांमधील घाईवरून दिसून आले.