वाघाच्या हल्ल्यात मागील दहा महिन्यांत ११ नागरिकांचा बळी गेला. दिवसेंदिवस वाघाकडून मानवावर हल्ले वाढतच चालले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी १ सप्टेंबरपासून वनसंरक्षक कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलन सुरू केले. ४ सप्टेंबरला जेलभराे आंदाेलन करण्यात आले. तसेच पुढे बेमुदत उपाेषणाचा इशारा आंदाेलकांनी दिला हाेता.
दरम्यान, वाघाला पकडण्यासाठी परवानगी मिळावी यासाठीचा प्रस्ताव वनवृत्त कार्यालयाने मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे पाठविला हाेता. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर त्या वाघाला जेरबंद करण्याची परवानगी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिली.
त्यानुसार वाघाला जेरबंद करण्यासाठी त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी दाेन पिंजरे लावण्यात आले आहेत. वनविभागामार्फत क्षेत्रीय स्तरावर उपाययाेजना केल्या जात आहेत, असे वनसंरक्षक यांनी कळविले आहे.
बाॅक्स
२० पेक्षा अधिक आंदाेलकांना केले स्थानबद्ध
आंदाेलनाची तीव्रता वाढविताना शनिवारी जेलभराे आंदाेलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, आंबेशिवणीचे उपसरपंच याेगाजी झंझाळ यांच्यासह २० पेक्षा अधिक गावकऱ्यांना पाेलिसांनी स्थानबद्ध करून साेडून दिले. तसेच वाघाला जेरबंद करण्यासाठी दाेन पिंजरे लावण्यात आले आहेत. ही माहिती वनसंरक्षकांनी दिल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले आहे.