शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

साडेदहा लाख नागरिकांना होणार डीईसी गोळ्यांचे वाटप

By admin | Updated: December 13, 2014 01:53 IST

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी व अल्बेंडाझोलच्या गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम ...

गडचिरोली : राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी व अल्बेंडाझोलच्या गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम ग्रामीण भागात १४ ते १६ डिसेंबर व शहरी भागात १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात साडेदहा लाख लोकांना आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन डीईसी गोळ्यांचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोगाचा २०१५ पर्यंत समुळ नायनाट करणे, समाजात नवीन हत्तीरोग रूग्ण तयार होऊ न देणे, हत्तीरोग बाधीत अवयवांची स्वच्छता व काळजी घेण, हत्तीरोगाविषयी लोकांना आरोग्य शिक्षण देणे हे सामुदायिक औषधोपचार मोहिमेचे उद्दिष्ट आहे. हत्तीरोग दुरीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील दोन वर्षांवरील सर्व नागरिकांना डीईसी गोळ्या वाटप करण्यात येणार आहे. सदर जबाबदारी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ते, मदतनिस, पर्यवेक्षण कर्मचारी आदींवर सोपविण्यात आली आहे. गोळ्या वाटपापासून गरोदर महिला व दुर्धर आजाराच्या रूग्णांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी आवर्जुन डीईसी गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी केले. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी आर. बी. ढोले उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)