शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जीवनगट्टा येथे सिलिंडरचा भडका

By admin | Updated: August 3, 2014 00:05 IST

स्वयंपाक आटोपल्यानंतर गॅस बंद करून गृहिणी दुसऱ्या खोलीत गेली असता, अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भडका उडाल्याची घटना एटापल्ली तालुका मुख्यालयापासून २ किमी

जीवितहानी टळली : घरातील सामान जळालेएटापल्ली : स्वयंपाक आटोपल्यानंतर गॅस बंद करून गृहिणी दुसऱ्या खोलीत गेली असता, अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भडका उडाल्याची घटना एटापल्ली तालुका मुख्यालयापासून २ किमी अंतरावर असलेल्या जीवनगट्टा येथे शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार संजय सुनिल सिकदर यांच्या घरी त्यांच्या पत्नीने स्वयंपाक आटोपल्यानंतर गॅस बंद केला. दुसऱ्या खोलीत जाताच अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. आवाज ऐकल्यानंतर संजय सिकदर यांच्या पत्नीने स्वयंपाक खोलीत येऊन पाहताच गॅसची नळी पेट घेत असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ शेजारच्या नागरिकांना बोलावून पेटता गॅस विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र उशीर झाल्याने घरातील सामान व कवेलुचे छत जळाले. यामुळे सिकदर कुटुंबियाचे हजारो रूपयाचे नुकसान झाले आहे. गॅस सिलिंडरच्या रेग्युलेटरमध्ये बिघाड असल्यामुळे सदर घटना घडल्याचे नागरिकांना लक्षात आले. या घटनेची माहिती सिकदर कुटुंबियांनी तहसील कार्यालयाला दिली. प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सिकदर कुटुंबियांनी केली आहे. घटनेच्यावेळी सिकदर कुटुंबातील सदस्य घरातच होते. सिलिंडरचा स्फोट झाला असता तर संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊन जीवितहानी झाली असती. परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे हानी टळली.