शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली शहरातून निघाली सायबर दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:50 IST

सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने पोलीस विभागाने ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सायबर दिंडी काढली. या दिंडीत पोलिसांसह शाळा, महाविद्यालयांची विद्यार्थी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देपोलिसांचा मार्च : जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने पोलीस विभागाने ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सायबर दिंडी काढली. या दिंडीत पोलिसांसह शाळा, महाविद्यालयांची विद्यार्थी सहभागी झाले होते.महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त २ ते ८ जानेवारी या कालावधीत गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे ‘रेझिंग डे’ राबविला जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मोहित गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी चौकातून मूल मार्गावर सायबर दिंडी काढण्यात आली. सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर माहितीचे फलक लावण्यात आले होते. पथनाट्याद्वारे सायबर गुन्हेगारी, एटीएम फ्रॉड, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून पसरविल्या जाणाऱ्या अफवा, आॅनलाईन खरेदी-विक्री व्यवहारादरम्यान होणारी फसवणूक आदींची जागृती करण्यात आली.रेझिंग डे निमित्त जिल्हा मुख्यालयासह जिल्हाभरातील पोलीस स्टेशनच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.१५ युवकांना मिळाला शिकाऊ वाहन परवानाजिल्ह्यातील आदिवासी, गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत ‘प्रगती’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत पोलिसांनी चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या विकासपल्ली व रेगडी या गावातील १५ युवकांना चारचाकी व दुचाकी वाहन चालविण्याचे परवाने काढून दिले.