टेकडामोटलाची घटना : मृतकाची रक्कमही पळविलीआसरअल्ली : अज्ञात आरोपींनी एका इसमाची धारदार तीक्ष्ण हत्याराने गळा कापून निर्घृण हत्या केल्याची घटना २ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास आसरल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेकडामोटला या गावी घडली. रमेश पर्वताल्लू सोदारी (२३) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. या संदर्भात मृतकाच्या कुटुंबीयांनी आसरअल्ली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रमेश ार्वतालू सोदारी याची अज्ञात इसमाने तीक्ष्ण हत्याराने गळा कापून हत्या केली व त्याचा मृतदेह गावाबाहेरील झाडाखाली आणून टाकला. मृतक रमेश सोदारी हा तेलंगणा राज्यातील फक्का गावात काम करीत होता. तो दसरा सणानिमित्ताने टेकडामोटला येथे आला होता. त्याच्याजवळ काही रक्कम होती. रमेश सोदारी हा रात्रीच्या सुमारास घराबाहेर फिरायला गेला असता, अज्ञात इसमाने त्याचेजवळील रक्कम हिसकावून त्याची हत्या केली, असा संशय मृतकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.या घटनेचा पुढील तपास आसरअल्लीचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. चव्हाण करीत आहेत. या घटनेमुळे टेकडामोटला या गावी खळबळ निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
गळा कापून इसमाची निर्घृण हत्या
By admin | Updated: October 4, 2014 23:27 IST