शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

१ लाख ६८ हजार हेक्टरमध्ये होणार धानाची लागवड

By admin | Updated: June 9, 2014 23:38 IST

जिल्ह्यात बाराही तालुके मिळून धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४६ हजार ८00 हेक्टर इतके आहे. सर्वाधिक चामोर्शी तालुक्यात २५ हजार ४00 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र धान पिकाचे आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात बाराही तालुके मिळून धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४६ हजार ८00 हेक्टर इतके आहे. सर्वाधिक चामोर्शी तालुक्यात २५ हजार ४00 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र धान पिकाचे आहे. कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाचे लक्षांक प्रस्तावित केले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. रोजगाराच्या दुसर्‍या कुठल्याही संधी नसल्यामुळे कृषी क्षेत्रावरच जिल्ह्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार गडचिरोली तालुक्यात भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १३ हजार ७00, आरमोरी १४ हजार, देसाईगंज ८ हजार ४00, कुरखेडा १५ हजार ४00, कोरची ९ हजार २00, धानोरा १७ हजार ७00, चामोर्शी २५ हजार ४00, मुलचेरा ५ हजार ७00, अहेरी ८ हजार ७00, एटापल्ली १३ हजार ५00, भामरागड ८ हजार ५00 आणि सिरोंचा तालुक्यात भात पिकाचे ६ हजार ६00 सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने धान पिकाच्या लागवडीचे लक्षांक वाढविले आहे. गडचिरोली तालुक्यात १८ हजार ५00, आरमोरी १७ हजार ५00, देसाईगंज ११ हजार, कुरखेडा १४ हजार ५00, कोरची ११ हजार, धानोरा १९ हजार ५00, चामोर्शी २८ हजार, मुलचेरा ७ हजार ५00, अहेरी १0 हजार ५00, एटापल्ली १४ हजार ५00, भामरागड ७ हजार ५00 आणि सिरोंचा तालुक्यात ८ हजार हेक्टर क्षेत्र धान पिकासाठी प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यात ३ हजार २00 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र सोयाबिन पिकाचे आहे. यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने सोयाबिन पिकाचे ३ हजार ७४0 हेक्टर इतके क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यात गडचिरोली २५0 हेक्टर क्षेत्र, आरमोरी ५0 हेक्टर क्षेत्र, देसाईगंज २५ हेक्टर, कुरखेडा ५0, कोरची ५0, धानोरा ५0, मुलचेरा १४0, अहेरी ५00, एटापल्ली २५, सिरोंचा १00 हेक्टर क्षेत्र आणि सर्वाधिक चामोर्शी तालुक्यात अडीच हजार हेक्टर क्षेत्र सोयाबिन पिकाच्या लागवडीसाठी कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार गेल्या २ वर्षात आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा आदी तालुक्यात सोयाबिन पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र नाही. मात्र यंदा भामरागड तालुक्याशिवाय इतर सर्व तालुक्यात सोयाबिन पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याच्या कृषी विभागाने वार्षिक नियोजनात निश्‍चित केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)