शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिवाळीच्या साहित्य खरेदीसाठी जिल्हाभरात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 23:02 IST

दिवाळी सणानिमित्त गेल्या ८ ते १० दिवसांपासून गडचिराेली शहराच्या सर्व भागांतील बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली आहे. त्रिमूर्ती चाैक, मुख्य बाजारपेठ, सराफा बाजारपेठ, तसेच चामाेर्शी, आरमाेरी, धानाेरा व मूल या प्रमुख मार्गावरील दुकानांमध्ये दिवाळी सणाला लागणारे विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय पाेटेगाव बायपास राेड, शिवाजी महाविद्यालय राेड, गाेकुलनगरकडे जाणाऱ्या मार्गावरही दुकाने सजली आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : प्रकाशाचा, आनंदाचा आणि खऱ्या अर्थाने घरात ‘लक्ष्मी’चे आगमन झाल्याने, उत्साहाचा सण असणाऱ्या दिवाळीसाठी सर्वच स्तरांतून खरेदीसाठी लगबग सुरू आहे. दिवाळी सणाची सुरुवात साेमवारपासून झाली असून, आठवडाभर हा सणाची लगबग राहणार आहे. धनत्रयोदशीला वस्तू खरेदीचे विशेष महत्त्व असल्यामुळे मंगळवारी गडचिरोलीसह जिल्हाभरातील बाजारपेठेत विविध वस्तुंच्या खरेदीची एकच लगबग सुरू होती. विशेषत: सुवर्णालंकार खरेदी करण्यासाठीही गडचिरोलीत गर्दी झाल्याचे दिसून आले. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस हाेय, तर त्यानंतर धनत्रयाेदशी, लक्ष्मीपूजन, गाेवर्धनपूजन व भाऊबीज असा हा क्रम आहे. या सणानिमित्त विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांसह साऱ्यांचीच गडचिराेलीच्या बाजारात मंगळवारला प्रचंड गर्दी केली होती. ग्राहकांच्या गर्दीमुळे त्रिमूर्ती चाैक परिसर फुलून गेला हाेता. बाजारपेठेच्या मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती. दिवाळी सणानिमित्त गेल्या ८ ते १० दिवसांपासून गडचिराेली शहराच्या सर्व भागांतील बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली आहे. त्रिमूर्ती चाैक, मुख्य बाजारपेठ, सराफा बाजारपेठ, तसेच चामाेर्शी, आरमाेरी, धानाेरा व मूल या प्रमुख मार्गावरील दुकानांमध्ये दिवाळी सणाला लागणारे विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय पाेटेगाव बायपास राेड, शिवाजी महाविद्यालय राेड, गाेकुलनगरकडे जाणाऱ्या मार्गावरही दुकाने सजली आहेत. फुटपाथवर गृहसजावटीचे विविध साहित्य, तसेच मातीच्या पणत्या, आकाशदिवे आदी साहित्य आहे.दिवाळी सण म्हटला की, रुचकर व स्वादिष्ट फराळ आलाच. हे फराळ बनविण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची किराणा दुकानात गेल्या आठवडाभरापासून गर्दी आहे, याशिवाय दिवाळी सणानिमित्त कपडे, फटाके आदी वस्तूंची खरेदीही जोमात सुरू आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुवर्णपूजनासाठी अनेक नागरिकांनी सराफा दुकानात जाऊन साेन्याच्या दागिन्यांची खरेदी केली. गडचिराेलीच्या कापड बाजारात तर सध्या पाय ठेवायलाही जागा नसल्याचे दिसून आले. 

कॅटरर्स व्यावसायिक वळले फराळ विक्रीकडेदिवाळी सणानिमित्त फराळ खाण्यावर सर्वांचाच भर असताे. मात्र, धावपळीच्या युगात अनेक सधन व श्रीमंत कुटुंबीय तयार झालेला (रेडीमेट) फराळाचे पदार्थ खरेदी करतात. हे पदार्थ घरी नेऊन मित्रमंडळी व आप्तेष्टांना खाऊ घालतात. गडचिराेली शहरातील काही कॅटरर्स व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला आपले दुकान सजवून फराळाचे विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत. याशिवाय स्वीट मार्टच्या दुकानातही फराळाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. चकली, शेव, चिवडा, माेतीचूर लाडू, बेसनाचे लाडू, तसेच गाेड पदार्थ उपलब्ध आहेत.

रांगाेळी खरेदीसाठी महिलांसाठी गर्दीशहरातील माेठ्या दुकानांसह फुटपाथवरील दुकानात विविध रंगाच्या रांगाेळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या शिवाय अनेक जण हातगाडी फिरवून रांगाेळी विकत असल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली शहरात पांढऱ्यासह विविध रंगाच्या रांगाेळीचा भाव १६ ते २० रुपये किलाे असा आहे. काही दुकानांत १५ रुपये तर काही दुकानांमध्ये २० रुपये किलाे दराने रांगाेळी विकली जात आहे.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Marketबाजार