महेंद्र चचाणे देसाईगंजकोरची तालुक्याच्या जंगलातून निघणाऱ्या जांभुळांवर सध्या नागपूरच्या व्यापाऱ्याची नजर पळली आहे. मागीलवर्षीपासून मोठ्या प्रमाणावर व्यापारी देसाईगंज शहरात जांभळाची खरेदी करण्यासाठी येत आहेत. शेतकऱ्यांकडून तुटपुंज्या दरात खरेदी करून व्यापारी मात्र या व्यवहारात मालामाल होत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात कोरची तालुक्याचे जांभळ सर्वदूर प्रसिध्द आहे. कुरखेडा, देसाईगंज व गडचिरोली या तीन ठिकाणी हे जांभळ पाठविले जातात. मागील वर्षीपासून नागपुरचे व्यापारी हे जांभळ खरेदी करण्यासाठी येत आहेत. दररोज सकाळी देसाईगंजच्या बाजारात बस किंवा मालवाहू वाहनातून मोठ्या प्रमाणावर हे जांभळ आणण्यात येतात. जांभळच्या एका पेटाऱ्यात पाच ते सात हजार जांभळ आणले जातात व हे पेटारे ३०० ते ४०० रूपयांत विकत घेतले जाते. मात्र व्यापारी ४० ते ५० रूपये शेकडा भावाने याची विक्री करतात. जिल्ह्याच्या इतर तालुक्यात नागपूरच्या भावाने कोरचीच्या या जांभळाची विक्री केली जाते. जंगलातून मेहनतीने जांभूळ जमा करणाऱ्या उत्पादकाच्या हाती मात्र काहीच पडत नाही.
कोरचीचे जांभूळ खरेदीसाठी नागपूरच्या व्यापाऱ्यांची गर्दी
By admin | Updated: June 19, 2015 01:35 IST