देसाईगंज : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने स्थानिक विश्रामगृहात शुक्रवारी वाहन परवाना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वाहन परवान्यासाठी वाहनधारकांनी एकच गर्दी केली होती.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने महिन्यातून एकदा वाहन परवाना काढण्याच्या श्बििराचे आयोजन करण्यात येते. जिल्हा कार्यालयात परवाना घेण्यासाठी गेल्यास त्या ठिकाणी आॅनलाईन परीक्षा द्यावी लागते. देसाईगंजात मात्र सर्व काम दलालांच्या मार्फतीने केले जात असल्याने दलालाच्या हातावर पैसे ठेवताच परवाना हातात मिळतो. यामध्ये दलालांचेही खिसे भरत असल्याने दलाल या शिबिरात दलाल जिल्हाभरातील वाहनधारकांना बोलावून घेतात. मागील तीन महिन्यांपासून या शिबिरात परवाना काढण्यासाठी एकच गर्दी उसळत आहे. प्रादेशिक परिवहन खात्यात दलालांचा वाढलेला प्रस्त त्यामुळे नागरिकांची होत असलेली लुबाडणूक लक्षात घेवून आरटीओ कार्यालय दलालमुक्त करण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश प्रत्येक आरटीओ कार्यालयला देण्यात आले आहेत. मात्र तालुकास्थळावरील शिबिरांमध्ये दलालांचेच वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाहन परवान्यासाठी उसळली गर्दी
By admin | Updated: February 15, 2015 01:00 IST