शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिगड्डामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:29 IST

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील शेतकऱ्यांची जवळपास १०० एकर जमीन मेडिगड्डा प्रकल्पाच्या शेजारी आहे. प्रकल्पावर साहित्य नेण्यासाठी एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडून रस्ता तयार केला जात आहे.

ठळक मुद्देभरपाई देण्याची मागणी : पोचमपल्लीतील शेतातून तयार केला जात आहे रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील शेतकऱ्यांची जवळपास १०० एकर जमीन मेडिगड्डा प्रकल्पाच्या शेजारी आहे. प्रकल्पावर साहित्य नेण्यासाठी एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडून रस्ता तयार केला जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.रस्ता तयार होत असल्याने नुकसानभरपाई देण्याबाबत पोचमपल्ली येथील शेतकऱ्यांनी सिरोंचाचे तहसीलदार यांना निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी केली. तहसीलदारांनी गावात सभा घेऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. मात्र कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मदत संबंधित शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. समस्येबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली. याबाबीकडे स्वत: लक्ष घालून समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाला दिले. सिरोंचा तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष सिरोंचा तालुक्याला आपण भेट देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जमिनीचे नुकसानभरपाई न दिल्यास कंपनीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व वित्त सभापती भाग्यश्री आत्राम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य ज्ञानकुमारी कौशी, युद्धिष्टीर बिश्वास, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ऋषीकांत पापडकर, मधुकर कोल्लुरी, धर्मराज वडलाकोंडा यांच्यासह सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी हजर होते.मेडिगड्डा सिंचन प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील काही शेतकऱ्यांची जमीन जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. या सिंचन प्रकल्पाचा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणताच फायदा नाही. तरीही शेतकरी जमीन देण्यासाठी तयार झाले. यानंतरही अनेक अडचणी निर्माण केल्या जात असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.