शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रशासनाकडून पीकस्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:00 IST

पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून अनेक प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गाैरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या एकूण उत्पादनात भर पडण्याचा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून अनेक प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गाैरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन उत्पादन वाढीस मदत मिळू शकते, या अनुषंगाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे.या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी विहीत नमुन्यात अर्ज भरून प्रवेश शुल्क, सातबारा व केवळ आदिवासी शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र जाेडून भाग घ्यावा. पीकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.रब्बी हंगाम २०२० मध्ये पीकस्पर्धेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे, खरीप हंगाम २०२१ साठीही जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करून पीकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.शेतकऱ्यांना विविध प्रयाेग करण्यासाठी प्राेत्साहित करणाऱ्या या पीक स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढला असून अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयाेग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत.

अशी आहे शेतकरी गट विभागणीसर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ अशी तालुकानिहाय स्पर्धकसंख्या निश्चित केली आहे. पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली किमान १० आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोगासाठी सर्वसाधारण गटासाठी ५ व आदिवासी गटासाठी ४ अशी किमान संख्या आहे.

स्पर्धेसाठी ११ पिकांचा समावेशपीकस्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल आदी ११ पिकांचा समावेश स्पर्धेसाठी करण्यात आला आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटांसाठी पीकनिहाय ३०० रुपये प्रवेश शुल्क लागणार आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत आहे. 

चार स्तरांवर मिळणार बक्षीसपीकस्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावर प्रथम बक्षीस ५ हजार, द्वितीय बक्षीस ३ हजार, तृतीय २ हजार, जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस १० हजार, द्वितीय बक्षीस ७ हजार, तृतीय ५ हजार,  विभाग स्तरावर प्रथम बक्षीस २५ हजार, द्वितीय बक्षीस २० हजार, तृतीय १५ हजार तर राज्य पातळीवर प्रथम बक्षीस ५० हजार, द्वितीय बक्षीस ४० हजार व तृतीय बक्षीस ३० हजार रुपये दिले जाणार आहेत.

 

टॅग्स :agricultureशेती