कुनघाडा रै येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर टिकले हे कामानिमित्त आपल्या शेतात गेले असता त्यांना एका बांधीत मगराचे पिलू दिसले. त्यांनी याची माहिती वनविभागाला देऊन ते पिलू त्यांच्या स्वाधीन केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिलाची ओळख पटवून त्या परिसरात असलेल्या तलावात सोडण्याचा सल्ला दिला. यावेळी क्षेत्र सहाय्यक एस.एम. मडावी, वनरक्षक गुरुदास वाढई, वनरक्षक युवराज मडावी, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार, पुंडलिक भांडेकर, उमेश गव्हारे , गजानन वासेकर, मुखरू शेरकी, काशिनाथ खोबे, दीपक भांडेकर, प्रकाश वासेकर, वामन भांडेकर, नकटु मोहूर्ले आदी उपस्थित होते.
(बॉक्स)
वैनगंगा नदीत मगरीचे वास्तव्य?
वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा अंतर्गत चार किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदी आहे. त्याच परिसरात एक कि.मी. अंतराच्या आत सराड व मानढोक हे पाणीसाठा असलेले बोडी-तलाव आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीत तर मगरीचे वास्तव्य नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र नदीपेक्षा तलावात मगरीचे वास्तव्य असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
260821\img-20210825-wa0195.jpg
मगरीच्या पिल्यास जीवनदान फोटो