शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपातास बाध्य करणाऱ्या तिघांवर गुन्हे

By admin | Updated: June 8, 2017 01:40 IST

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार करणाऱ्या एका युवकास तसेच अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार करणाऱ्या एका युवकास तसेच अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी युवकाला सहकार्य करणाऱ्या अन्य दोघांवर पुराडा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणातील आरोपींची नावे सचिन नैताम, गणपत उसेंडी व कैलास मडावी अशी आहेत. पीडित युवतीने पुराडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दीड महिन्यापूर्वी म्हणजे २१ एप्रिल २०१७ रोजी युवतीचे लग्न चिनेगाव येथील एका युवकाशी रितीरिवाजानुसार झाले. तेव्हापासून पती-पत्नी चिनेगाव येथे एकत्र वास्तव्य करीत होते. परंतु २८ मे रोजी नवविवाहित महिलेच्या पोटात दुखू लागले. त्यानंतर ती आपल्या पत्नीसह कढोली येथील एका खासगी दवाखान्यात तपासणीकरिता गेली. दरम्यान डॉक्टरांनी तिला पाच महिन्याची गर्भवती असल्याचे सांगून तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला व तिला घरी परत पाठविले. लग्नास केवळ दीड महिन्यांचा कालावधी झाला असताना पत्नी पाच महिन्याची गर्भवती कशी, असा प्रश्न पतीसमोर उपस्थित झाला. पतीला राग आल्याने त्याच दिवशी आपल्या पत्नीला तिच्या माहेरी जामटोला येथे सोडून दिले व पत्नी आपल्या स्वगावी परतला. त्यानंतर पीडित युवतीने ती गर्भवती राहण्यास दोषी असलेल्या युवकाचे नाव आपल्या कुटुंबियांना सांगितले. सचिन मय्याराम नैताम हा युवक तिला मेहुणा लागत होता. त्यामुळे तो तिच्या घरी तो नेहमी यायचा. दरम्यानच्या काळात आम्हा दोघांचे प्रेम जुळले. यानंतर सचिनने मला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. यातून मी गर्भवती राहिली. परंतु त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे मी एका महिलेच्या घरी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी बैठक बोलावून गर्भधारणेस दोषी युवकाचे मला नाव विचारले व त्याच्या घरी जाण्यास सांगितले. गावकऱ्यांना मी सचिन नैताम याचे नाव सांगून त्याच्या घरी राहण्यास गेली. परंतु सचिन घरी नसल्याने त्याच्या बहिनीने घरी राहण्यास मज्जाव करून मला तिथून हाकलून दिले. त्यामुळे मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित करणारा सचिन नैताम तसेच वारवी येथे एका महिलेकडे नेऊन बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या गणपत उसेंडी व कैलास मडावी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पीडित युवतीने केली. ‘त्या’ महिलेचा शोध सुरू पुराडा पोलिसांनी आरोपी युवक सचिन नैताम याचेवर भादंविचे कलम ३७६ व गर्भपातास सहकार्य करणारे गणपत उसेंडी व कैलास मडावी यांचेवर भादंविचे कलम ३१३, ३१५, ३१६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुराडा पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतले असून अवैध गर्भपात करणाऱ्या महिलेचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास प्रभारी पोलीस अधिकारी व्ही. एस. गुशींगे करीत आहेत.