शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडला भेट देतील, असे वातावरण तयार करा

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

राज्यभरातील शिक्षक कुमठे बिटाला भेट देऊन तेथील शैक्षणिक वातावरण जाणून घेत आहेत. भामरागड तालुक्यातही

भामरागड : राज्यभरातील शिक्षक कुमठे बिटाला भेट देऊन तेथील शैक्षणिक वातावरण जाणून घेत आहेत. भामरागड तालुक्यातही असे शैक्षणिक वातावरण तयार करा, की किमान विदर्भातील शिक्षक भामरागड तालुक्यातील शाळांना भेटी देतील, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केले. दरम्यान भामरागड तालुक्यातील सर्वच १०५ शाळांमध्ये ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन करण्यासाठी तयारी केली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी भामरागड तालुक्यातील सर्वच १०५ शाळा दत्तक घेतल्या आहेत. या शाळांची चालू शैक्षणिक वर्षातील प्रगती जाणून घेण्यासाठी भामरागड येथे मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला शिक्षण आयुक्त कार्यलय पुणे येथील एस. एच. महाजन, सुभाष मोहीते, डायटचे प्राचार्य बी. जी. चौरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, निरंतर शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, भामरागड पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, गटशिक्षणाधिकारी दडमारे, अहेरीचे गटशिक्षणाधिकारी विक्रम गिरे, जि. प. सदस्या लैजा चालुरकर, ग्यानकुमारी कौशी, भामरागड पंचायत समिती सभापती रंजना उईके यांच्यासह तालुक्यातील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.आढावा बैठकीदरम्यान ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन करण्यासाठी ३५ शाळांची रचना करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित शाळांमध्येही हे काम ८० ते ९० टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहे. आठ ते दहा दिवसांत संपूर्ण १०५ शाळांमध्ये ज्ञानरचनावादाप्रमाणे शिक्षण दिले जाईल, अशी माहिती देण्यात आली. लोकसहभागातून सद्य:स्थितीत एक शाळा डिजीटल झाली असून तालुक्यातील संपूर्ण शाळा डिजीटल करण्याचा मानस संवर्ग विकास अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. साधन व्यक्ती चांगदेव सोरते यांनी शाळांनी केलेल्या गुणवत्तेचे सादर केले. जिल्हा समन्वयक नितेश बोरकर यांनी शाळांमध्ये झालेले बदल व पुढे करावयाची कामे याची माहिती सादर केली. कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करताना डॉ. भापकर यांनी भामरागड तालुक्यातील परिस्थिती अतिशय वाईट आहे, हे जरी सत्य मान्य केले तरी ही परिस्थिती बदलविणे आपले कर्तव्य आहे, हे प्रत्येक शिक्षकाने लक्षात घेतले पाहिजे. १०० टक्के विद्यार्थी प्रगत करण्याबरोबरच एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)