शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थेच्या माध्यमातून उद्योग निर्मिती व्हावी!

By admin | Updated: February 18, 2017 01:59 IST

सहकार क्षेत्राचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील पतसंस्था प्रगतशील आहे.

अशोक नेते यांचे प्रतिपादन : सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण गडचिरोली : सहकार क्षेत्राचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील पतसंस्था प्रगतशील आहे. मात्र त्या तुलनेत विदर्भातील पतसंस्था पाहिजे, त्या प्रमाणात प्रगतशील नाही. सहकार क्षेत्र व कायद्याचे संपूर्ण ज्ञान अद्यावत असणे गरजेचे आहे. शिवाय आॅनलाईन व्यवहार व तंत्रज्ञानाचा वापर करून पतसंस्थांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात उद्योग निर्मिती झाली पाहिजे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी, नागरी तथा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था संघ गडचिरोलीच्या वतीने स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सहकार प्रशिक्षण/कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ क्रेडीट को-आॅपरेटीव्ह सोसायटी फेडरेशनचे संचालक अनिल पाटील म्हशाखेत्री, धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्थान नागपूरचे माजी प्राचार्य जगदिश किल्लोळ, पतसंस्था संघाचे अध्यक्ष प्राचार्य खुशाल वाघरे, भाजपचे पदाधिकारी विलास भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार अशोक नेते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील काम प्रशिक्षणाशिवाय अधिक प्रभावी होऊ शकत नाही. सहकार क्षेत्रातील अपुरे ज्ञान, संचालक मंडळातील समन्वयाचा अभाव, योग्य व्यवस्थापन व नियोजन नसणे यासह अनेक कारणांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो पतसंस्था डबघाईस आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पतसंस्थेमार्फत पेट्रोलपंप व इतर व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही पतसंस्थांमार्फत उद्योग निर्मिती होऊन रोजगाराची दालने खुली झाली पाहिजे, असे खासदार नेते यावेळी म्हणाले. याप्रसंगी अनिल म्हशाखेत्री, जगदिश किल्लोळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य खुशाल वाघरे, संचालन प्रा. शेषराव येलेकर यांनी केले. कार्यक्रमाला पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)