शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

अल्पसंख्यांकांच्या योजनांबाबत जनजागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:33 IST

१५ कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक नागरिक व विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी शुक्रवारी दिले.

ठळक मुद्देआयोगाचे अभ्यंकर यांचे निर्देश : विविध विभागांचा अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १५ कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक नागरिक व विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी शुक्रवारी दिले.महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आज गडचिरोली दौºयावर आले असता, त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींची भेट घेतली. तसेच सर्व विभागाच्या प्रमुखांची कामासंदर्भात आढावा बैठक विश्रामगृहात आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस. आर. पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, ए.आर. लांबतुरे, उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश उचे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. शरदचंद्र पाटील, समाजकल्याण निरीक्षक मेश्राम, तहसिलदार वासनिक, तहसीलदार दयाराम भोयर, सहाय्यक नियोजन अधिकारी सुनिल पाटील, समाज कल्याणचे सारंग पाटील, स्वंयरोजगार व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी शेंडे आदी उपस्थित होते.अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरिता पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग सुरु करणे, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना, अल्पसंख्यांक शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभू सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनांचा आढावा घेतला.अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये शिकणाºया गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश अभ्यंकर यांनी दिले.रमाई घरकूल योजनेंतर्गत ६ हजार ८०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार अर्जांना मंजुरी दिली आहे. अल्पसंख्यांक समाजातील ५४० युवकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाºयांनी अभ्यंकर यांना आढावादम्यान दिली.