शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

नागरिक पितात ओढ्याचे पाणी

By admin | Updated: October 3, 2016 02:16 IST

धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरूमगाव परिसरातील

तीन महिने उलटले : कटेझरी येथील चार हातपंप बंदमुरूमगाव : धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरूमगाव परिसरातील कटेझरी नं. २ येथील एकूण ५ पैकी ४ हातपंप मागील तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने गावातील नागरिकांना १ किमीची पायपीट करून लगतच्या ओढ्यातील दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. गावातील जलस्त्रोत सुस्थितीत आहेत की नाही, याची स्थानिक प्रशासनाने दखल घ्यायची असते. जलस्त्रोत बंद अथवा नादुरूस्त असल्यास वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा स्थानिक प्रशासन करीत असते. याचाच संदर्भ कटेझरी ग्राम पंचायतीने घेऊन पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करून गावातील हातपंपाची दुरूस्ती करण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दखल घेण्यात आली नाही. मुरूमगाव परिसरातही यंदा भरपूर पर्जन्यवृष्टी झाल्याने ओढ्यातून नेहमी गढूळ पाणी वाहत असते. तरीसुद्धा येथील महिलांना १ किमीची पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. (वार्ताहर)ग्रा. पं. च्या मागणीची दखल नाहीगावातील ५ पैकी ४ बंद असलेल्या हातपंपाची दुरूस्ती करण्याबाबत स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने पंचायत समिती व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून समस्येकडे लक्ष वेधले होते. परंतु या घटनेला तीन महिन्याचा कालावधी उलटूनही प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना अद्यापही ओढ्यातील पाणी आणून प्यावे लागत आहे.