शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भाकपाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:53 IST

शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, वीज बिलात वाढलेले कर कमी करण्यात यावे, .....

ठळक मुद्देतहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन : सरसकट कर्जमाफी द्या, वाघाचा बंदोबस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, वीज बिलात वाढलेले कर कमी करण्यात यावे, रवी, कासवी व कोंढाळा जंगल परिसरातील हल्लेखोर वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने मंगळवारी आरमोरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.या धरणे आंदोलनात भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, डॉ. महेश कोपुलवार, जिल्हा सहसचिव अमोल मारकवार, किसान सभेचे सचिव देवराव चवळे यांनी आपल्या भाषणातून शासन व प्रशासनाने सदर मागण्यांबाबत तत्काळ शासन व प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. कोपुलवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर राज्य सरकारवर ताशेरे ओढले.यावेळी हरीपाल खोब्रागडे, चंद्रभान मेश्राम, माणिक कुर्वे, मारोती नरूले, अमोल दामले, प्रशांत खोब्रागडे, गुलाब नारनवरे, हिरालाल येरमे, केशव ठाकरे, रसिका मरप्पा, रेशमा नारनवरे, हिरालाल येरमे, केशव ठाकरे, रशिका मराप्पा, रेशमा नारनवरे, मंदा कामथे, संघमित्रा तामसटवार, जगदीश मेश्राम यांच्यासह विविध गावातील नागरिक व भाकपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आहेत मागण्याशेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव शेतमालाला द्यावा, एपीएल, बीपीएल असा भेद न करता रेशनच्या दुकानातून सर्वांना धान्य देण्यात यावे, रवी परिसरातील हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करावा, वाघाच्या हल्ल्यातील मृतकाच्या कुटुंबीयांना व जखमींना तातडीने आर्थिक मदत द्यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.