शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने गायी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:32 IST

तालुक्यातील लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेल्या विजेच्या खांबावरील इन्सुलेटर तुटल्याने विजेचा धक्का लागून दोन गायी ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली.

ठळक मुद्देलगाम येथील घटना : इन्सुलेटर तुटल्याने झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेल्या विजेच्या खांबावरील इन्सुलेटर तुटल्याने विजेचा धक्का लागून दोन गायी ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली.लगाम येथील राजे धर्मराव हायस्कूलजवळ असलेले वीज खांब मागील एक वर्षापासून तुटले होते. वीज खांब तुटले असल्याने वीज कर्मचारी खांबावर चढत नव्हते. इन्सुलेटरही काही प्रमाणात तुटले होते. मात्र खांबावरच चढता येत नसल्याने वीज कर्मचारी इन्सुलेटरही बदलवित नव्हते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक इन्सुलेटर जमिनीवर साचलेल्या पाण्यात पडले. इन्सुलेटर पडल्याने पाण्यात प्रवाह सुरू होता. गायी जाताच त्यांना विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडल्या. घटनास्थळ हे गावातच आहे. मात्र सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. ठार झालेल्या गायी नरेंद्र मडावी व गजानन शेडमाके यांच्या मालकीच्या आहेत. पोलीस पाटील किरमा मडावी यांनी घटनेचा पंचनामा केला.तुटलेला खांब बदलवावा, याबाबत गावकऱ्यांनी अनेकवेळा स्थानिक कर्मचाºयांना विनंती केली होती. मात्र वीज कर्मचारी व अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. यासाठी जबाबदार असलेल्या वीज कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे. त्याचबरोबर संबंधित लाईनमनच्या वेतनातून कपात करून पशुपालकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.बेजूर येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठारतालुका मुख्यालयापासून आठ किमी अंतरावर असलेल्या बेजूर जंगल परिसरात वाघाने गायवर हल्ला केला. यात गाय ठार झाली. सदर घटना शनिवारी घडली. सदर गाय सैनु दुर्वा यांच्या मालकीची आहे. पशुपालकाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे. जंगल परिसरात वाघ आढळल्याने बेजूरवासीयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.