शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या प्रवासी गाड्यांना आवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:12 IST

आम्ही वर्षाचे ४० ते ५० हजार रुपये शासनाला टॅक्स भरून रितसर परवाना घेऊन प्रवासी वाहतूक करतो. पण तरीही आमच्यावरच पोलीस कारवाई करतात आणि विनापरवाना चालणाऱ्या पांढऱ्या प्रवासी वाहनांना सूट दिली जाते, हे असे का?

ठळक मुद्देकाळी-पिवळी वाहनधारकांची हाक : सहकुटुंब उपोषणाला बसण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आम्ही वर्षाचे ४० ते ५० हजार रुपये शासनाला टॅक्स भरून रितसर परवाना घेऊन प्रवासी वाहतूक करतो. पण तरीही आमच्यावरच पोलीस कारवाई करतात आणि विनापरवाना चालणाऱ्या पांढऱ्या प्रवासी वाहनांना सूट दिली जाते, हे असे का? त्यांच्याकडून पोलिसांना जास्त हप्ता मिळतो म्हणून हा प्रकार सुरू आहे का? असे प्रश्न करत काळीपिवळी वाहनधारकांनी शुक्रवारी आपला संताप व्यक्त केला.यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी, परिवहन अधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात देऊन सहकुटुंब उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.जिल्ह्यात अनेक मार्गांवर काळीपिवळी जीपमधून प्रवासी वाहतूक केली जाते. त्यासाठी ते परिवहन विभागाकडे टॅक्स भरून रितसर परवानाही घेतात. पण एक-दोन प्रवासी जास्त बसविले तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. दुसरीकडे विनापरवाना चालणाºया पांढºया रंगाच्या प्रवासी जीपगाड्यांनी कितीही नियम मोडले तरी त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते, असा आरोप काळी-पिवळी टॅक्सी मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत केला. सदर कारवाया वडसा आणि कुरखेडा पोलीस ठाण्यांकडूनच जास्त प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले.पांढºया गाड्यांवर कारवाई होत नसेल तर आम्हीही त्यांच्याप्रमाणे टॅक्स न भरता विनापरवाना गाड्या चालवायच्या का? असाही सवाल त्यांनी केला आहे. काळी-पिवळी टॅक्सी मालकांच्या परिस्थितीचा विचार करून सदर अनधिकृत गाड्यांसोबतच छत्तीसगडी ट्रॅव्हल्स बसगाड्या आणि विनापरवाना चालणाऱ्या काळी-पिवळी गाड्या बंद करण्याचे आदेश वरिष्ठांनी द्यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.पत्रपरिषदेला दुर्गेश्वर सोनटक्के, विनोद डाहाके, श्याम थोटे, रुपेश बल्लारी, जगदीश मेश्राम, लियाकत सय्यद, गणपत ताराम आदी अनेक जण उपस्थित होते.

टॅग्स :Taxiटॅक्सी