शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

होळींकडून न्यायालयाचा अवमान

By admin | Updated: February 10, 2017 02:12 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून निवडून आलेले डॉ. देवराव होळी यांच्या विरोधात उच्च

नामदेव उसेंडी यांचा आरोप : निवडणूक विभागाने गुन्हा दाखल करावागडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून निवडून आलेले डॉ. देवराव होळी यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिला असून या निकालात त्यांचे आमदारकीचे पद रद्द केले आहे. तरीही डॉ. देवराव होळी हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान स्वत:ला आमदार समजूनच निवडणुकीचा प्रचार करीत आहेत. हा न्यायालयाचा अवमान आहे. त्याचबरोबर निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे डॉ. देवराव होळी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे.डॉ. देवराव होळी यांचा राजीनामा मंजूर झाला नसनाताही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला. या विरोधात नारायण जांभुळे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. १९ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने डॉ. देवराव होळी यांच्या विरोधात निकाल दिला. या निकालामध्ये न्यायालयाने डॉ. देवराव होळी यांचे आमदारकीचे पद रद्द (डिस्कॉलीफॉय) केले आहे. त्याचबरोबर २०१४ ची निवडणूक रद्द केली. सदर जागा रिक्त असल्याचे आपल्या निकालात न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने डॉ. होळी यांना सर्वाेच्च न्यायालयात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्यांचे पद गोठवित असल्याचा निकाल दिला आहे. सदर निकालाची प्रत तत्काळ विधानसभा अध्यक्षांना कोर्टाच्या मार्फतीने पाठविली जाते. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर डॉ.होळी यांची आमदारकी संपली आहे. तरीही डॉ. देवराव होळी हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान प्रचार करीत आहेत. निवडणुकीसाठी भाजपतर्फे लावलेल्या बॅनरवर डॉ. होळी यांचा उल्लेख माजी आमदार असा न करता, आमदार असा करण्यात आला आहे. यामुळे न्यायालयाचा अवमान होत आहे. त्याचबरोबर जनतेची दिशाभूलही होत आहे. हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक विभागाने डॉ. होळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. डॉ. होळी यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे काँग्रेस पक्षाच्या मार्फतीने तक्रार केली जाईल, अशी माहिती माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिली आहे. जनतेनी डॉ. होळी यांच्यापासून सावध राहावे. डॉ. होळी यांच्या वेतन तसेच इतर प्रशासकीय बाबींवर झालेला खर्च पूर्णपणे वसूल करून तो शासनाकडे जमा करावा, अशी मागणीही डॉ. उसेंडी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. राम मेश्राम, नगरसेवक सतीश विधाते, राजेश ठाकूर, सुमेध तुरे, सी. बी. आवळे, मसराम, निशांत नैताम, विनोद भोयर, तुळशीदास भोयर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)