शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

डिझेलच्या अवाजवी खर्चावर न.प.च्या सभेत नगरसेवकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत नगराध्यक्षांच्या वाहनाचा खर्च म्हणून ११ लाख १० हजार १३२ रुपये तर मुख्याधिकारी यांच्या वाहनाचे जून २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीतील खर्च ३ लाख ३३ हजार ९६ रुपयांची देयक सादर करण्यात आले.

ठळक मुद्देअडीच वर्षात १४ लाखांचे बिल । नगराध्यक्ष म्हणतात, नियमानुसारच खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरूवारी पार पडली. या सभेत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या वाहनासाठी डिझेल व इतर खर्च म्हणून १४ लाख ४३ हजार २२८ रुपयांच्या देयकासह मंजुरी प्रदान करण्याचा विषय ठेवण्यात आला होता. या विषयासह भाजपसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला.जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत नगराध्यक्षांच्या वाहनाचा खर्च म्हणून ११ लाख १० हजार १३२ रुपये तर मुख्याधिकारी यांच्या वाहनाचे जून २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीतील खर्च ३ लाख ३३ हजार ९६ रुपयांची देयक सादर करण्यात आले. या देयकाला विरोधी नगरसेवक प्रा. रमेश चौधरी, सतिश विधाते, तसेच भाजपाचे नगरसेवक संजय मेश्राम, माजी नगराध्यक्ष भुपेश कुळमेथे, रितू कोलते, पूजा बोबाटे, रंजना गेडाम, गीता पोटावी यांनी विरोध दर्शविला.शासनाच्या नियमानुसार नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन मंजूर आहे. वाहन खरेदी केले असते तर नगर पालिकेचे ९ लाख रुपये खर्च झाले असते. स्वत:चे वाहन वापरून आपण नगर परिषदेचे पैसे वाचविले. तसेच जे बिल बनविण्यात आले आहे, ते शासनाच्या नियमाप्रमाणेच आहेत, असे सांगून विषयाची बाजू मांडली.मात्र नगर परिषद व मुख्याधिकारी यांनी अवास्तव खर्च दाखविला आहे. जेवढे पैसे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या वाहनावर खर्च होत आहेत, तेवढ्या किमतीत नगर परिषदेचे स्वत:चे वाहन खरेदी करणे शक्य झाले असते. विशेष म्हणजे, नगर परिषदेकडे अनेक वाहन चालक आहेत. या वाहनचालकाचा वापर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी करू शकले असते. शासनाच्या नियमात खर्च करण्याचा अधिकार असेल तर सर्वसाधारण सभेची परवानगी घेण्याची गरज काय, असा मुद्दा उपस्थित केला. आजपर्यंत एकाही मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी वाहन खर्चाचे बिल जोडले नाही. पहिल्यांदाच अशा प्रकारचे बिल जोडण्यात आले आहे, असाही मुद्दा मांडला. मात्र देयकाच्या बाजुने सभागृहात बहुमत असल्याने देयक मंजूर झाले. क आणि ड श्रेणीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला मानधन तत्वावर पुन्हा नियुक्त करता येत नाही. असा नियम असताना उईके या कर्मचाºयाला कसे काय नियुक्त केले, असा उपस्थित केला.नगराध्यक्ष, मुख्याधिकारी वाहनाविनागडचिरोली नगर परिषद ही ब दर्जाची आहे. या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयासाठी नियमानुसार वाहन मंजूर आहे. नगर परिषदेची स्थापना होऊन ३८ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र नगर परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकाºयासाठी स्वत:चे वाहन नाही. वाहन खर्चावरून वाद होण्याची शक्यता असल्याने स्वत:चे वाहन असणे फायद्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका