गडचिरोली : पत्नी व बहिणीच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटचे फेरफार घेऊन नवीन सातबारा तयार करून देण्याच्या कामासाठी लाच घेणाऱ्या कोटगल येथील तलाठी अशोक गणपत कुंभारे याला बुधवारी २.२० वाजता रंगेहात पकडण्यात आले. संबंधित तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोटगल परिसरात पत्नी व बहिणीच्या नावे तक्रारकर्त्याने प्लॉट खरेदी केला होता. त्याचा फेरफार घेऊन नवीन सातबारा मागण्यासाठी तक्रारकर्ते तलाठी अशोक गणपत कुंभारे (५२) यांच्याकडे गेले. त्यांनी दोन हजार रूपयांची लाच या कामासाठी मागितली. त्यानंतर १५०० रूपयांची लाच स्वीकारताना बुधवारी दुपारी २.२० वाजता कोटगल तलाठी कार्यालयातच त्यांना पकडण्यात आले. कुंभारे यांच्या विरूद्ध गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, पोलीस निरीक्षक एम. एस. टेकाम, सहाय्यक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलीस हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, पोलीस नाईक रवींद्र कत्रोजवार, वसंत जौंजाळकर, सुधाकर दंडिकवार, पोलीस शिपाई मिलींद गेडाम, महेश कुकुडकर, सोनल आत्राम, उमेश मासुरकर, स्वप्नील वडेट्टीवार यांनी पार पाडली. (जिल्हा प्रतिनिधी)
कोटगलच्या तलाठ्यास अटक
By admin | Updated: March 19, 2015 01:27 IST