शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी शेतीचा खर्च वाढला

By admin | Updated: August 27, 2015 01:45 IST

गडचिरोली जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात धान रोवणी कामाला सुरुवात झालेली नाही.

पाऊस बेपत्ता : शेतात कचऱ्याचे प्रमाण वाढलेआरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात धान रोवणी कामाला सुरुवात झालेली नाही. शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या पिकांमध्ये तसेच मोकळ्या शेतांमध्येही मोठ्या प्रमाणावर गवत उगविले असून यंदा पावसाअभावी शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामात पावसाच्या भरवशावरच शेती करतो. यंदा सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली आहे. अनेक तालुक्यात अद्याप गतवर्षीच्या सरासरी एवढाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केलेली नाही. जुलै, आॅगस्ट महिन्यात प्रचंड उकाडा वातावरणात निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतामानामुळे रोवणी झालेले धानपीकही करपायला लागले आहे. शेतामध्ये पाण्याअभावी कचरा मोठ्या प्रमाणावर उगवला असून हा कचरा साफ करण्यासाठी महिला मजुरांची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक ताळेबंद कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. (तालुका प्रतिनिधी)