शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेचा खर्च अमर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:15 IST

गडचिरोली नगर परिषदेला आस्थापना खर्च करण्याची मर्यादा एकूण प्राप्त उत्पन्नाच्या ५५ टक्के एवढी असताना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात नगर परिषदेने सुमारे ८१.७० टक्के एवढा खर्च केला आहे.

ठळक मुद्देनोकरभरतीवर प्रतिबंध : २०१६-१७ या वर्षात आस्थापनेवर उत्पन्नाच्या ८१.७० टक्के खर्च

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेला आस्थापना खर्च करण्याची मर्यादा एकूण प्राप्त उत्पन्नाच्या ५५ टक्के एवढी असताना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात नगर परिषदेने सुमारे ८१.७० टक्के एवढा खर्च केला आहे. मागील तीन वर्षांपासून मर्यादेच्या पलिकडे खर्च गेला असल्याने नगर परिषद संवर्गाची पदे भरण्यास अडचण निर्माण झाली आहे.नगर विकास विभागाने नगर परिषदेच्या दर्जानुसार आस्थापना खर्च करण्याची मर्यादा घालून दिली आहे. अ दर्जाच्या नगर परिषदेसाठी आस्थापना खर्च ५० टक्के, ब दर्जाच्या नगर परिषदेसाठी ५५ टक्के व क दर्जाच्या नगर परिषदेसाठी ६० टक्के एवढी मर्यादा घालून देण्यात आली आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाºया नगर परिषदेला नगर परिषद संवर्गाचे पदे भरण्यास प्रतिबंध घातला जातो. त्यामुळे अपवाद वगळता सर्वच नगर परिषदा मर्यादेच्या पलिकडे खर्च होणार नाही. याची विशेष खबरदारी घेतात. मात्र गडचिरोली नगर परिषदेत अनागोंदी कारभार सुरू असून याचा परिणाम आस्थापना खर्चावर दिसून येत आहे.२०१६-१७ या आर्थिक वर्षात गडचिरोली नगर परिषदेला मालमत्ता करातून २ कोटी ५९ लाख ९५ हजार, जाहिरात करातून ६० हजार, बाजार उत्पन्नातून ८ लाख २३ हजार, शाळा इमारतींच्या भाड्याच्या माध्यमातून ७ लाख ८२ हजार, जोडणी शुल्कातून २१ हजार, विकास शुल्कातून २८ लाख १३ हजार, जन्म, मृत्यूंच्या दाखल्यांपासून ५ लाख २६ हजार, नोटीस फी, परवाने फी व दंडाच्या माध्यमातून ७६ हजार, दवाखाना, ग्रंथालय, कोंडवाडा, कत्तलखाना, समाज मंदिर, नाट्यगृहापासून १ लाख ३८ हजार, अग्नीशमन पाणी टँकर शुल्क, रूग्णवाहिका शुल्काच्या माध्यमातून ३ लाख २४ हजार, असे एकूण नगर परिषदेचे स्वत:चे उत्पन्न ३ कोटी १६ लाख ४५ हजार रूपयांचे आहे. शासनाकडून नगर पालिकेला सहायक अनुदान म्हणून ३ कोटी ४९ लाख १६ हजार रूपयांचे अनुदान मिळाले आहे. पोर्ट अनुदानातून २ लाख ३ हजार, गौणखनिजातून एक लाख तसेच शिक्षण व दवाखान्याच्या कर्मचाºयांच्या वेतनासाठी ३ कोटी ५० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अनुदाने व नगर परिषदेचे स्वत:चे उत्पन्न मिळून एकूण वार्षिक उत्पन्न १० कोटी १८ लाख एवढे आहे. याच वर्षात नगर पालिकेला पाणी पुरवठ्यातून ९४ लाख रूपये उत्पन्न मिळाले आहे. तर पाणी पुरवठ्यावरील एकूण खर्च १ कोटी २२ लाख एवढा आहे. म्हणजेच पाणी पुरवठा योजनेवर उत्पन्नापेक्षा २७ लाख ७३ हजार रूपये अधिकचा खर्च होत आहे.नगर पालिकेच्या स्थायी आस्थापनेवर ६ कोटी २४ लाख ६५ हजार, अस्थायी आस्थापनेवर २३ लाख ८८ हजार, रोजंदारी व मानधन तत्वावरील कर्मचाºयांवर ५ लाख २३ हजार, कर्मचाºयांच्या दिलेल्या आर्थिक लाभावर ४ लाख २१ हजार, निवृत्त कर्मचाºयांच्या वेतनावर १ कोटी ५१ लाख ६१ हजार असे एकूण ८ कोटी ९ लाख ५८ हजार रूपये खर्च झाले आहेत.नगर विकास विभागाने आस्थापना खर्च काढावयाचे जे सूत्र ठरवून दिले आहे. त्यानुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षातील गडचिरोली नगर परिषदेचा आस्थापना खर्च ८१.७० टक्के एवढा आहे. जो ग्राम विकास विभागाने घालून दिलेल्या ५५ टक्के मर्यादेच्या पलिकडे आहे. याकडे गडचिरोली नगर परिषद पदाधिकारी व अधिकारी यांनी लक्ष घालून आस्थापना खर्च मर्यादेत राहिल याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा नगर परिषदेचा प्रशासकीय डोलारा खचण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाणी पुरवठ्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्तगडचिरोली शहराला नगर परिषदेच्या मार्फत पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्यातून नगर परिषदेला २०१६-१७ या आर्थिक वर्षात वार्षिक ९४ लाख ९६ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र या वर्षातील खर्च सुमारे १ कोटी २२ लाख ६९ हजार रूपये एवढा आहे. म्हणजेच पाणी पुरवठा योजना २७ लाख ७३ हजार रूपयांनी तोट्यात असल्याचे दिसून येते.