शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील समस्या मार्गी लावा

By admin | Updated: May 24, 2017 00:36 IST

गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पाणीपुरवठयाच्या तसेच अन्य मूलभूत सुविधा मार्गी लावण्यात याव्या, ...

निवेदन सादर : जि.प., न.पं. पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटलेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पाणीपुरवठयाच्या तसेच अन्य मूलभूत सुविधा मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी जिल्हा परिषद व पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर व गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी गडचिरोली शहर व जिल्ह्यातील विविध समस्यांसंदर्भात पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेंतर्गत वाढीव पाईपलाईनची गरज आहे. विसापूर वॉर्डातील पाणी समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी या वॉर्डात जलकुंभ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, भूमिगत गटार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, गोदरीमुक्त शहरासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी विकासाच्या अनेक बाबींवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी नगर पालिकेचे पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे उपस्थित होते. गडचिरोली शहराच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.